R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या वारकरी संप्रदायासाठी महत्वाच्या असलेल्या १० हजार कोटींच्या पालखी मार्गाचा पंतप्रधान मोदी यांच्या...

वारकरी संप्रदायासाठी महत्वाच्या असलेल्या १० हजार कोटींच्या पालखी मार्गाचा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शुभारंभ

 

पंढरपूर | वारकरी संप्रदायासाठी महत्वाच्या असलेल्या १० हजार कोटींच्या पालखी मार्ग शुभारंभ सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. आषाढी वारीसाठी आळंदी व देहू मधून लाखो भाविक पंढरीच्या वाटेवर असतात. लाखो भाविक ज्या मार्गावरून चालत येतात, तो रस्ता भव्य व सुंदर असावा या हेतूने नितीन गडकरी यांनी पालखी मार्गाचे विस्तारीकरण करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दोन्ही रस्त्यांचे काम सुरू झाले आहे.

मात्र दुसरीकडे या मार्गाचे श्रेय मिळविण्यासाठी भाजपने हा कार्यक्रम हायजॅक केला असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी मार्गाचे रुंदीकरणाचे काम केंद्रीय रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे. यापूर्वी ३० ऑक्टोबर रोजी याचा शुभारंभ नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत होणार होता .

मात्र यापूर्वी गडकरी यांच्या मंत्रालयाकडून महाराष्ट्रात झालेले कार्यक्रम शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांसह इतर राज्यातील मंत्र्यांच्या उपस्थितीमुळे हे कार्यक्रम राष्ट्रवादीने हायजॅक केल्याचा आक्षेप घेत भाजप नेत्यांनी रद्द करायला लावला आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घेण्याचा घाट घातला असे म्हटले जात आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments