R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या शिवसेना-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी सांगलीत गोपीचंद पडळकरांची गाडी फोडली

शिवसेना-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी सांगलीत गोपीचंद पडळकरांची गाडी फोडली

 

सांगली | आपल्या वादग्रस्त विधानामुळे तसेच महाविकास आघाडी सरकारवर टीका करत सतत चर्चेत राहणारे भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना-राष्ट्रवादीच्या गटामध्ये सांगलीमध्ये राडा झाल्याचे वृत्त आहे. या राड्यामध्ये गोपीचंद पडळकर यांची गाडी फोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीमधील आटपाडीमधील साठे चौकात ही घटना घडली आहे. आमदार गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना-राष्ट्रवादीचे गट आमने-सामने आले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

दोन्ही गटांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर वातावरण आणखी चिघळले. पडळकर यांची गाडी फोडली असून त्याच्या ताफ्यातील काही गाड्या फोडल्या आहे. या धुमश्चक्रीमध्ये काहीजण जखमी झाल्याची माहितीसमोर आली आहे. या राड्यामुळे आटपाडीमध्ये तणावाचे वातावरण आहे. परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी आटपाडीमध्ये पोलिसांची अधिक कुमक वाढवली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सोसायटी गटातील उमेदवार पळवा- पळवीवरुन वाद झाल्याचे कारण समोर आले आहे.

घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा पोहोचला आहे. या राड्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस राजू जानकर यास गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीसह त्यांच्या ताफ्यातील तीन गाड्यांची तोडफोड केली आहे. या घटनेनंतर आटपाडीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आटपाडी शहरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments