R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या नोटबंदी फेल, मोदीजी कोणत्या चौकात यायचं सांगा, नवाब मालिकांची टीका

नोटबंदी फेल, मोदीजी कोणत्या चौकात यायचं सांगा, नवाब मालिकांची टीका

 

मुंबई | मोदी सरकारच्या नोटबंदीला आता पाच वर्षे पूर्ण झाली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. नोटबंदी फेल गेली. नोटबंदीमुळे काळा पैसा काही परत आला नाही तसेच भ्रष्टाचारदेखील कमी झाला नाही. मोदीजी तुम्ही ३ महिने मागितले होते. आता त्यांनी सांगावे की आम्ही कोणत्या चौकात यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.’

मलिक म्हणाले की, नोटबंदीमुळे देशात बेरोजगारी वाढली. अर्थव्यवस्थेचा कणा मोडल्याचा दावा मलिक यांनी केला. नोटबंदीमुळे देशातून आंतकवाद, काळा पैसा संपला का? असे सवाल त्यांनी केलेत.नोटबंदी नंतर रांगेत उभे राहून अनेक लोकांचा जीव गेला. शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अर्थव्यवस्था कोलमडल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.

‘पंतप्रधान मोदींनी नोटबंदीची घोषणा केली तेव्हा भ्रष्टाचार, दहशतवाद संपेल, काळा पैसा परत आणू अशी अनेक आश्वासने दिली. तसंच भ्रष्टाचार संपला नाही तर मला चौकात शिक्षा द्या असं म्हटलं होतं. मोदीजींनी म्हटल्याप्रमाणे झालं नाही तेव्हा त्यांना आता कोणती शिक्षा द्यायची असा प्रश्न मलिक यांनी विचारला आहे.’

 

 

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments