R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या काशिफ खानला मी ओळखत नाही, त्याच्याशी माझं फोनवर संभाषण झालेलं नाही -...

काशिफ खानला मी ओळखत नाही, त्याच्याशी माझं फोनवर संभाषण झालेलं नाही – अस्लम शेख

 

मुंबई | राज्यात ड्रग्स प्रकरण चांगलेच तापलेले असताना याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात शीतयुद्ध सुरु झालेले असताना या प्रकरणात मंत्री अस्लम शेख यांचे नाव घेण्यात आले होते. या प्रकरणी आता मंत्री अस्लम शेख यांनी भाष्य करत भाजपवर घणाघाती टीका केली आहे.

शेख म्हणाले की, मी काशिफ खानला ओळखत नाही. त्याने मला पार्टीसाठी निमंत्रण दिलं होतं. पण मी पार्टीला गेलो नाही. क्रुझवरील पार्टीची मला काहीच माहिती नव्हती. त्या पार्टीच्या माध्यमातून काही षडयंत्र रचण्याचा डाव होता की नाही हे मला माहीत नाही. त्याचा तपास एजन्सीने करावं, असा खुलासा पालकमंत्री अस्लम शेख यांनी केला.

पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काशिफ खानच्या आमंत्रणावर प्रतिक्रिया व्यक्त केली. मी काशिफ खान नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही. त्याला मी कधीच भेटलो नाही. त्याने मला पार्टीला बोलावलं होतं. मी पालकमंत्री आहे. त्यामुळे अनेक लोक लग्न सोहळे, वाढदिवसाला मला बोलवत असतात. त्याचप्रमाणे मला या पार्टीचंही आमंत्रण होतं. या प्रकरणात षडयंत्र होतं की नाही याचा एजन्सी तपास करत आहे, असं अस्लम शेख म्हणाले.

काशिफ खानकडे माझा नंबर आहे की नाही मला माहीत नाही. माझा मोबाईल पीएकडे असतो. तो एका ठिकाणी मला भेटला होता. तो तिथे कसा आला मला माहीत नाही. त्याने मला भेटून पार्टीचं निमंत्रण दिलं होतं. आता त्या पार्टीत काय होणार होतं. मला माहीत नाही. हे तपास यंत्रणेने शोधावं. काशिफशी फोनवर संभाष झालं नाही. संभाषण झाल्याचं मला आठवत नाही. त्याने भेटून आमंत्रण दिलं होतं हे मात्र नक्की, असं त्यांनी सांगितलं.

 

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments