R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या एसटी संपामुळे खाजगी बस ऑपरेटर्सने वाढवले तिकिटाचे दर

एसटी संपामुळे खाजगी बस ऑपरेटर्सने वाढवले तिकिटाचे दर

 

मुंबई | एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करा या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपला आता वेगळे वळण लागत असून संप चिघळून सुमारे २२० डेपोमधले कामकाज ठप्प झाले आहे. या संपाचा प्रवाशांना फटका बसला तरी प्रायव्हेट बस ऑपरेटरचे मात्र फावले असून तिकिटाचे दर वाढूं प्रवाशांची लुटमाराच सुरु केली आहे.

जिथे १०० रुपये तिकीट आहे ते ३०० रुपये मोजून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. पुणे-नगर चे भाडे ६०० पुढे गेले आहे. तसेच गाड्यांमध्ये जागा मिळत नाही त्यामुळे प्रवाशांना कोंबून प्रायव्हेट ऑपरेटर्स आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. दीर्घ पल्ल्याच्या गाड्यांचे भाडे चौपट झाल्याच्या बातम्या आहेत. ९०० ते १००० हजार रुपये भाडे असणाऱ्या प्रवासाला तीन – साडेतीन चार हजारापर्यंत भाडे आकारल्याच्या बातम्या आहेत.

संपावर तोडगा काढण्यासाठी दुपारपर्यंत अध्यादेश काढण्याचे आश्वासन ठाकरे सरकारने हायकोर्टात दिले आहे. परंतु कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे याबाबत मात्र ठाकरे सरकार कोणतीही ठोस भूमिका जाहीर करायला तयार नाही. त्यामुळे कर्मचारी देखील संपावर ठाम आहेत. मात्र कर्मचारी आणि राज्य सरकार यांच्या भांडणाचा फटका प्रवाशांना बसताना दिसून येत आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments