R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या शाहरूख खानची गुप्त दिल्लीदौरा ? राजकीय नेत्यांची भेट घेतल्याची चर्चा

शाहरूख खानची गुप्त दिल्लीदौरा ? राजकीय नेत्यांची भेट घेतल्याची चर्चा

 

मुंबई | शाहरुख खान याने गुप्तपणे शनिवारी रात्री दिल्ली गाठली होती. त्यानंतर आज शाहरुख खान मुंबईत परतला. मुंबई विमानतळाबाहेर पडताना शाहरुख खानने याने लपूनछपून आपल्या कारमध्ये प्रवेश केला असल्याचे म्हटले जाते. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. आता त्यांच्या या दिल्लीवारीमुळे नव्या चर्चेला उधाण आले आहे

ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने अटक केली होती. जवळपास २५ दिवस आर्यन खान याला कोठडीत रहावे लागले होते. तर, दुसऱ्या बाजूला या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शाहरुख खानच्या दिल्ली भेटीला मोठे महत्त्व आले आहे. शाहरुख खानने आपल्या चार्टर्ड विमानाने मुंबई-दिल्ली असा प्रवास केला.

दिल्लीमध्ये शाहरुख खानने काही राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या भेटी घेतल्यानंतर शाहरुख खान मुंबईत चार्टर्ड विमानाने परतला. ही दिल्ली भेट गुप्त ठेवण्यासाठी शाहरुखने प्रयत्न केले होते, असे सूत्रांनी म्हटले. शाहरुखसोबत त्याचा नेहमीचा बॉडिगार्ड नव्हता. तर, एका अभिनेत्रीचा बॉडिगार्ड शाहरुख सोबत होता. तर, मुंबई विमानतळावरही शाहरुख खानची कार नव्हती. शाहरुखने एका दुसऱ्या कारमधून प्रवास केला असल्याची चर्चा सुरू आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments