R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश ठाण्यात फटाक्यांमुळे लागल्या सात आगी; दोन दिवसात २७ आगीच्या घटना

ठाण्यात फटाक्यांमुळे लागल्या सात आगी; दोन दिवसात २७ आगीच्या घटना

ठाणे | ठाणे शहरातील विविध भागांत दिवाळीच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये तब्बल २७ आगीच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये फटाक्यांमुळे लागलेल्या फक्त सात आगीच्या घटनांचा समावेश आहे. फटाक्यांमुळे प्रामुख्याने कचराच पेटला आहे. या सर्व आगीच्या घटना किरकोळ असून यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नसल्याचे ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले

दिवाळीच्या पहिल्या दिवशी शहरात डझनभर घटनांमध्ये आगी लागल्या असून त्या सर्व आगी संध्याकाळनंतर लागल्या आहेत. सहा घटना या फटाक्यांमुळे लागल्या आहेत. यामध्ये पांचपाखाडी, नामदेव वाडीतील मरी गोल्ड बिल्डिंगच्या ११ व्या मजल्यावर फटाक्यांमुळे खिडकीच्या नायलॉन जाळ्याला किरकोळ आग; तर कळवा येथील गणपती विसर्जन घाटाजवळील फटाक्यांमुळे कचऱ्याला आग लागली. घोडबंदर रोड, मानपाड्यात फटाक्यांमुळे एसीच्या बाहेरील युनिटला आग लागली.

वर्तक नगर, पोखरण रोड क्र. १ येथे फटाक्यांमुळे नारळाच्या झाडाला आग लागली. वागळे इस्टेट, रोड नंबर १६ येथील कृषी कार्यालयाजवळील मालवण किनारा पोळीभाजी केंद्राच्या प्लास्टिकच्या ताडपत्रीमध्ये फटाक्यांमुळे किरकोळ आग लागली. याचबरोबर दिवा डम्पिंगसह वसंत विहार येथील जस्मिन टॉवर,च्या १५ व्या मजल्यावरील खोली आणि सह्याद्री हाऊसमधील वॉशिंग मशीनमध्ये तसेच बाळकुम येथे ट्रकच्या ड्रायव्हर केबिनमध्ये किरकोळ आग लागली; तर दुसऱ्या दिवशीही १५ ठिकाणी आग लागली असून त्याही किरकोळ आगी असून एका घटनेत कारने पेट घेतला आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

डोंबिवलीत परदेशातून आलेल्या त्या ६ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

  कल्याण-डोंबिवली | पुन्हा एकदा राज्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.हे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. तसेच लोकांमध्येही भितीचं वातावरण आहे. परदेशातून...

राहुल गांधींवर टीका करणाऱ्या ममता बॅनर्जींना नाना पटोलेंनी दिले सडेतोड प्रतिउत्तर

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर राज्यातील काँग्रेसचे नेते चांगलेच चवताळले आहे. 'वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश...

स्वच्छ सर्वेक्षणात बदलापूर अव्वल, राज्यात दुसरा,देशात १४वा क्रमांक

बदलापूर | स्वच्छ सर्वेक्षणात भरारी घेत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा राज्यातून दुसरा, तर देशातून १४वा क्रमांक पटकावला आहे. तीन वर्षांत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने स्वच्छ...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments