R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या ठाण्यात दिवाळीनंतर निवडणुकीचे वाजणार फटाके, सर्वच राजकीय पक्षांनी सुरु केली तयारी !

ठाण्यात दिवाळीनंतर निवडणुकीचे वाजणार फटाके, सर्वच राजकीय पक्षांनी सुरु केली तयारी !

 

ठाणे | ठाणे महापलिका निवडणुकीचे सर्वच इच्छुकांना ठाणे महानगर पालिकेचे वेध लागले आहेत. त्यात राज्य सरकारने अध्यादेश जरी करीत पालिकेला कच्चा प्रारूप आरखडा ३० नोव्हेंबरपर्यंत तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यात ४६ प्रभागांमध्ये प्रत्येकी तीन; तर एका प्रभागात चार नगरसेवक असणार आहेत. त्यामुळे डिसेंबर महिन्यात प्रभागरचना स्पष्ट होणार असून, दिवाळीनंतरच खऱ्या अर्थाने निवडणुकीचा धुरळा उडणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

ठाणे पालिकेच्या निवडणुकीनिमित्त सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सरकारने अध्यादेश जारी करून ३० नोव्हेंबरपर्यंत प्रभागांचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यात सुरुवातीला १ सदस्यीय पद्धतीने निवडणूक घेतली जाणार असल्याचे सांगितले जात होते.

मात्र दुसरीकडे आता पालिकेच्या वतीने प्रभागांची रचना हाती घेण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा यात बदल झाला आणि तीन सदस्यीय पद्धतीने प्रभागांची रचना करताना २०११ ची लोकसंख्या गृहीत धरावी असे सांगण्यात आले. त्यानुसार पालिकेने नव्याने प्रभागांची रचना आखण्यास सुरुवात केली आहे.

२०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत २०२१ ची जनगणना गृहीत धरण्यात आली आहे. त्यानुसार आता १४२ नगरसेवक पालिकेत निवडून जाणार असून ४७ प्रभाग असणार असल्याचे सांगण्यात आले आहे, परंतु यामध्ये ४६ प्रभागांमध्ये प्रत्येकी तीन नगरसेवक; तर एका प्रभागात चार नगरसेवक असे मिळून १४२ नगरसेवक पालिकेत निवडून जाणार आहेत.

दिवाळीनंतर पालिकेच्या माध्यमातून कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्यात येणार असून तो ३० नोव्हेंबरपर्यंत राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे. दरम्यान, या नव्या समीकरणामुळे प्रत्येक वॉर्ड हा आता ३५ ते ३७ हजार ते ४० हजार पर्यंतचा असणार असल्याचे बोलले जात आहे. वाढीव लोकसंख्येनुसार घोडबंदर आणि दिव्यात प्रभाग वाढण्याची चिन्हे असल्याचे सांगितले जात आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments