R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या एसटी बंद असल्याने रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांना अधिक गर्दी

एसटी बंद असल्याने रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांना अधिक गर्दी

 

ठाणे : राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) कामगारांचा संप तसेच दिवाळीनंतर मुंबईतील कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर बोलाविण्यास सुरुवात केल्याने सोमवारी ठाणे रेल्वे स्थानकातील तिकीट खिडक्यांवर दैनंदिन तिकीट घेण्यास तसेच मासिक पास घेण्यास प्रवाशांच्या मोठय़ा रांगा लागल्या.

तिकीट, पास मिळविण्यासाठी प्रवाशांना रांगेत १० ते १५ मिनिटे घालवावी लागली. त्यामुळे अनेकांना कामाच्या ठिकाणी वेळेत पोहचता आले नाही. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी संप पुकारला. त्याचा परिणाम ठाणे शहरातही जाणवला. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला एसटीचा थांबा आहे. या एसटी थांब्याहून बोरिवली, मीरा रोड, भाईंदर, वसई, विरार, पालघर या ठिकाणी बसगाडय़ा जातात. सोमवारी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे ठाणे स्थानकाजवळील एसटी थांब्यावरून बसगाडय़ा बाहेर पडल्या नाहीत. त्यामुळे मीरा-भाईंदर, बोरिवली, विरार तसेच पालघर भागात जाणाऱ्या अनेक प्रवाशांनी ठाणे स्थानकातून उपनगरी रेल्वेमार्गे प्रवास करण्याचा निर्णय घेतला.

दिवाळीनिमित्ताने गावी गेलेले काही प्रवासी ठाणे स्थानकात उतरून बोरिवली किंवा मीरा रोडला एसटीनेच जात असतात. तसेच दिवाळीच्या रजा संपल्याने मुंबईतील कंपन्यांची कार्यालये सुरू झाली आहे. तर काही कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना आठवडय़ातून दोन ते तीन दिवस कार्यालयात प्रवेश देतात.

या सर्वाचा परिणाम ठाणे स्थानकातील तिकीट खिडक्यांवर झाला. सोमवारी सकाळी मासिक पास आणि तिकीट काढण्यासाठी ठाणे स्थानकात प्रवाशांच्या सर्वच तिकीट खिडक्यांवर मोठय़ा रांगा लागल्या होत्या. उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्यासाठी करोना प्रतिबंधक लशींच्या दोन मात्रा घेणे बंधनकारक आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र तसेच युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास तिकीट खिडक्यांवर दाखविल्यानंतरच प्रवाशांना तिकीट मिळते. त्यामुळे युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास किंवा प्रमाणित केलेले प्रमाणपत्र तपासताना तिकीट खिडक्यांवरील रेल्वे कर्मचाऱ्यांची दमछाक उडाली होती.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments