R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति जळगाव बलात्कार प्रकरणी थेट सोशल मीडियावर भाजपा नेत्याच नाव ?

जळगाव बलात्कार प्रकरणी थेट सोशल मीडियावर भाजपा नेत्याच नाव ?

 

जळगाव | शासकीय अजिंठा विश्रामगृहामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची चर्चा रविवारपासून जोरदार सोशल मीडियावर सुरू आहे. याप्रकरणी सोमवारी भाजप नेते आणि माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी ही अफवा असल्याचं सांगत अशा अफवा पसरवून भाजप आमदारांच्या बदनामीचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. तसंच या प्रकरणात तथ्य असेल तर त्याचा तपास करुन सोक्षमोक्ष लावला पाहिजे, असंही महाजन यांनी म्हटलं आहे.

यावेळी महाजन म्हणाले की, असं कुणाचंही नाव कसं घेतलं जाऊ शकते? सोशल मीडियातून हा विषय मी वाचतो आहे. हे अतिशय गंभीर आहे. विषयाला कुठलेही हातपाय नसताना अशी चर्चा होणे चुकीचं आहे. मी पोलिसांशी, एसपींशी बोललो पण ते म्हणतात कुठेच काहीही नाही आहे. सोशल मीडियावर ही एक अफवा होती. मग याचे नाव घ्या असे ते म्हणाले होते.

तसेच त्याचे नाव घ्या, औरंगाबादचे कुणी आले, कुणी म्हणते पी.ए. आला, तर कुणी म्हणते आमदार आला. मला वाटते ही बातमी फेक आहे, चुकीची आहे आणि खरी असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे आणि सोक्षमोक्ष झालाच पाहिजे. मात्र, विनाकारण कुणालाही बदनाम करायचे, कुणाचंही नाव सोशल मीडियावर टाकायचे हा प्रकार गंभीर आहे,’ असं महाजन यांनी म्हटलं आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

२३ वर्षांत नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की… मालिकांची नारायण राणेंवर घणाघाती टीका

  मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र टीका करण्याचे एकही संधी सोडताना दिसून येत नाहीये....

एनसीबीची मोठी कारवाई; ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

  राज्यात ड्रग्स प्रकरण चांगलेच गाजत असताना एनसीबीची कारवाई सुरूच असलेली दिसून येत आहे त्यातच एनसीबी मुंबईने नांदेडमध्ये कारवाई करत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला...

आघाडीमधील मित्रपक्षांनी काँग्रेसला गृहीत धरू नये, नाना पटोलेंचा इशारा

  कल्याण | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून येणाऱ्या आघवी निवडणुकीला तिन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे बोलले जात होते. मात्र दुसरीकडे येणाऱ्या स्थानिक निवडणुकीत काँग्रेस...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments