R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या नवाब मलिक यांचे सूचक ट्विट "मेरे ख़याल को बेड़ी पहना नहीं सकते"

नवाब मलिक यांचे सूचक ट्विट “मेरे ख़याल को बेड़ी पहना नहीं सकते”

 

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यक मंत्री दररोज पत्रकार परिषद घेऊन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे पितळ उघडे पडताना दिसून येत आहे. त्यातच त्यांनी या प्रकरणात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे सुद्धा नाव या प्रकरणात घेतले होते. आता त्या पाठोपाठ आज नवाब मलिक पुन्हा पत्रकार परिषद घेऊन नवा खुलासा करणार आहे त्यापूर्वीच त्यांनी सुचक ट्विट केले आहे. समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यासंदर्भात मलिक यांनी हे सूचक ट्विट केलंय. माझं बोलणं बंद केलं तरी देखील माझ्या ध्येयाला आणि लढ्याला तुम्ही बंद करु शकत नाही, असं ट्विट नवाब मलिक यांनी केलंय.

 

नवाब मलिक यांनी गेल्या महिनाभरापासून पत्रकार परिषद घेत एनसीबीची कारवाई, समीर वानखेडे आणि ड्रग्ज संदर्भातील कारवायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. नवाब मलिक यांनी त्यासोबत ट्विटची मालिका देखील सुरु ठेवली होती. नवाब मलिक यांच्या विरोधात समीर वानखेडे यांच्या वडिलांनी कोर्टात १.२५ कोटी रुपयांचा दावा दाखल केला होता. नवाब मलिक यांना न्यायालयानं आज त्यांची भूमिका मांडण्यास सांगितलं आहे. नवाब मलिक आज त्या प्रकरणावर नेमकं काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. मलिक रोज सोशल मीडियावरून टार्गेट करत असल्याचं सांगत त्यांना सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यापासून मनाई करण्याचे आदेश देण्याची विनंतीही वानखेडे यांच्या वकिलाने केली आहे. तर वानखेडे यांच्या आरोपावर उद्याच उत्तर देण्याचे आदेश कोर्टाने मलिक यांच्या वकिलांना दिले आहेत. नवाब मलिक आज उत्तर दाखल करण्याची शक्यता आहे.

 

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments