R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति खासदार उदयनराजे भोसले काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांच्या भेटीला

खासदार उदयनराजे भोसले काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांच्या भेटीला

 

भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सोमवारी जिल्हा बँकेच्या पार्श्वभूमीवर फलटण टु कराड असा दौरा केला होता. या दौऱ्यात सकाळी फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर तर सायंकाळी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हे भाजपचे राज्यसभा खासदार आहेत तर सभापती रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असून काँग्रेसचे बडे नेते असलेले पृथ्वीराज चव्हाण यांना कराडमध्ये ही भेट घेतली. जिल्हा बँकेत दोन दिवसात अर्ज माघार चा दिवस असल्याने छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या या व्यक्तींच्या भेटींनी राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. दिवसभर जिल्हा बँकेचे अनुषंगाने या भेटी सुरू असल्याचेही राजकीय जाणकारांचे मत आहे

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सकाळी सुरज विला या निवासस्थानी तर सायंकाळी कराड येथील पाटण कॉलनीत काँग्रेसचे बडे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेत जिल्हा बँकेवर चर्चा केली यावेळी मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, शरद काटकर, इंद्रजीत चव्हाण हे उपस्थित होते. यावर आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहे

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

ममता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटू शकणार नाहीत

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात त्या शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे...

२३ वर्षांत नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की… मालिकांची नारायण राणेंवर घणाघाती टीका

  मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र टीका करण्याचे एकही संधी सोडताना दिसून येत नाहीये....

एनसीबीची मोठी कारवाई; ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

  राज्यात ड्रग्स प्रकरण चांगलेच गाजत असताना एनसीबीची कारवाई सुरूच असलेली दिसून येत आहे त्यातच एनसीबी मुंबईने नांदेडमध्ये कारवाई करत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments