R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'पप्पाचा शेवटचा दिवस !' आर आर पाटील यांच्या मुलीची वडिलांबद्दल भावनिक पोस्ट...

‘पप्पाचा शेवटचा दिवस !’ आर आर पाटील यांच्या मुलीची वडिलांबद्दल भावनिक पोस्ट !

 

पुणे | राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या नेतृत्वची आणि त्यांनी केलेल्या विकासाच्या कामाची आठवण आजही काढली जाते. तसेच राजकीय क्षेत्रात त्यांनी एक आदर्श निर्माण केला होता. आर. आर. पाटील यांचे फेब्रुवारी २०१५ रोजी आजारपणामुळे अकाली निधन झाले होते. दरम्यान आबांची लेक स्मिता पाटील यांनी फेसबुकवर आबांचा गावातील शेवटचा दौरा आणि त्यांच्या अखेरच्या दिवसांबाबत भावूक पोस्ट शेअर केली आहे.

काय आहे स्मिता पाटील यांची फेसबुक पोस्ट वाचा !

पप्पाचा शेवटचा दिवस !
आज 8 नोव्हेंबर … बरोबर 7 वर्ष झाली . माझ्या वडीलाना आज घरातून शेवटचे बाहेर जाऊन .. ! आजच्या दिवशी 2014 मध्ये सकाळी 11 वाजता माझ्या वडीलांनी घर सोडले.

काही दिवस दिल्लीला विश्रांतीसाठी निघालोय असं पप्पांनी माझ्या आजीला सांगितले होते.
3 नोव्हेंबरला नवीन विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात पप्पांनी अत्यंत घणाघाती भाषण केले होते . या भाषणाचे महाराष्ट्र विधानसभेने टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले होते.

6 नोव्हेंबर ला पप्पा अंजनीला घरी आले हेलिकॉप्टर मधुन सगळं गाव दोन – दोनदा फिरून बघितले.घरातून बाहेर जाताना पप्पा नेहमी उपस्थित सर्व लोकांना अभिवादन करत असत त्याच प्रमाणे खिडकीतून सर्व कुटुंबीयांन कडे बघुन जात असत.पण त्या दिवशी मात्र पप्पा जाताना लोकांच्या मधुन वेळ काढून मी व माझी बहिण सुप्रिया आम्ही वरती आमच्या रूम मध्ये होतो. तर पप्पा त्या दिवशी वरती येऊन आम्हा दोघा बहिणी ना घट्ट मिठी मारली व त्या क्षणी त्याच्या डोळ्यात पाणी उभारले होते.

आम्ही दोघी बहिणी ही विचार करू लागलो की पप्पाना काय वाटले असावे की पप्पांनी मिठ्ठी मारली व प्पपा च्या डोळ्यात का पाणी उभारले असावे ? पण आम्हाला वाटले नव्हते की,आज पप्पा नी आम्हाला शेवट चे खुशीत घेतले असावे व त्या दिवशी पप्पांनी गावच्या मारूती – शंकराचेही न चुकता दर्शन घेतलं होते.

स्वतःच्या गावात चावडीसमोर निवडून आल्याबददल सत्कार स्वीकारताना पप्पा म्हणाले होते की,स्वतःच्या गावाकडून हा माझा शेवट चा सत्कार ठरावा ! आता आणखी किती सत्कार करणार .. ? मृत्यु पप्पा ना अधीच दिसला होता का ?

 

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments