R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या केजरीवाल सरकारचा निर्णय, आता घराच्या घरी बनवा इलेक्ट्रिक कारसाठी चार्जर

केजरीवाल सरकारचा निर्णय, आता घराच्या घरी बनवा इलेक्ट्रिक कारसाठी चार्जर

 

नवी दिल्ली | देशात वाढत्या इंधनदरवाढीमुळे सामान्य नागरिक हतबल झाला असून वाढत्या महागाईमुळे आता सामान्य नागरिक इलेकट्रीक गाड्यांकडे वळाला आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारनेही पुढाकार घेतला आहे. आता दिल्लीत तुम्हाला इलेक्ट्रिक वाहन चार्जर बसवण्यासाठी फक्त २,५०० रुपये खर्च करावे लागणार आहे.दिल्लीचे परिवहन मंत्री गोपाल राय यांच्या मते, दिल्लीतील सरकार चार्जिंग स्टेशनसाठी पहिल्या ३०,००० अर्जदारांना ६,००० रुपये सबसिडी देत ​​आहे, ज्यामुळे प्रत्येक चार्जरची प्रभावी किंमत सुमारे २,५०० रुपये आहे. गोपाल राय यांनी सांगितले की, दिल्ली सरकारच्या या निर्णयामुळे चार्जर्सची किंमत ७० टक्क्यांपर्यंत कमी होईल.

दिल्ली सरकार मॉल्स, अपार्टमेंट्स, हॉस्पिटल्स आणि शहरातील इतर ठिकाणी दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसह हलक्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी वैयक्तिक चार्जर बसविण्यासाठी केवळ २,५०० रुपये शुल्क आकारेल. दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गहलोत यांनी सिंगल विंडो सुविधेचा शुभारंभ करताना ही घोषणा केली की, ग्राहक संबंधित डिस्कॉम पोर्टलला भेट देऊन किंवा खाजगी चार्जिंग स्टेशनच्या स्थापनेसाठी हेल्पलाइन नंबरवर कॉल करून लाभ घेऊ शकतात.

असा करा चार्जरसाठी अर्ज
१) अर्ज करण्यासाठी पहिल्यांदा अर्जदाराने पोर्टलवर जावे.
२) सरकारने वेबसाइटवर सूचीबद्ध केलेल्या चार्जरमधून तुमचे विश्वसनीय इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जर निवडा.
३) इतकेच नाही तर तुम्ही या चार्जर्सच्या किंमतींची तुलना करू शकता आणि त्यांना ऑनलाइन किंवा फोन कॉलद्वारे ऑर्डर करू शकता.
४) इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जरची स्थापना आणि ऑपरेशन अर्ज सबमिट केल्यापासून सात कामकाजाच्या दिवसांत पूर्ण केले जाईल.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

महानगरपालिका,नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

  मुंबई |  कोवीड-19 मुळे प्रशासकीय आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या, अशा परिस्थितीत पडताळणी समित्यांकडून केवळ जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्यामुळे उमेदवारांना, राखीव असलेल्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

Recent Comments