R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या विधानपरिषद निवडणुकीच्या तारखा झाल्या जाहीर कोल्हापूरसह ६ जागांसाठी निवडणूक जाहीर

विधानपरिषद निवडणुकीच्या तारखा झाल्या जाहीर कोल्हापूरसह ६ जागांसाठी निवडणूक जाहीर

 

मुंबई | राज्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील रिक्त होत असलेल्या ८ पैकी ६ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. नगर आणि सोलापूर वगळता मुंबई, कोल्हापूर, धुळे-नंदुरबार, अकोला-बुलढाणा-वाशिम आणि नागपूर या ५ मतदारसंघातील ६ जागांसाठी १० डिसेंबरला मतदान होणार आहे. तर मतमोजणी १४ डिसेंबरला होणार आहे. या ८ आमदारांची मुदत येत्या १ जानेवारी २०२२ रोजी संपत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खेचाखेची सुरु होणार आहे.

नगर आणि सोलापूर या मतदारसंघातील मतदार अर्थात महानगरपालिका, नगरपालिकांचे नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती यांची संख्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याने या ठिकाणी निवडणूक जाहीर करण्यात आलेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका पार पडल्यानंतर त्या घोषित होण्याची शक्यता आहे.

येत्या १ जानेवारी २०२२ निवृत्त होत असलेले आमदार : निवृत्त होत असलेल्या आमदारांच्या यादीत रामदास कदम (शिवसेना) मुंबई, भाई जगताप (काँग्रेस) मुंबई, सतेज पाटील (काँग्रेस) कोल्हापूर , प्रशांत परिचारक (अपक्ष) सोलापूर, अमरिश पटेल (भाजप) धुळे- नंदुरबार, गोपीकिशन बजोरिया (शिवसेना) अकोला-बुलढाणा , गिरिशचंद्र व्यास (भाजप) नागपूर, अरूण जगताप (राष्ट्रवादी) नगर यांचा समावेश आहे.

तसेच विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी अधिसूचना १६ नोव्हेंबरला काढण्यात येणार आहे. तर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २३ नोव्हेंबर २०२१ असणार आहे. २६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. १० डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर या निवडणुकीची मतमोजणी १४ डिसेंबरला होणार आहे. १६ डिसेंबरपर्यंत निवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

महानगरपालिका,नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

  मुंबई |  कोवीड-19 मुळे प्रशासकीय आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या, अशा परिस्थितीत पडताळणी समित्यांकडून केवळ जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्यामुळे उमेदवारांना, राखीव असलेल्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

Recent Comments