R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या निलोफर मलिक पाठणार देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस !

निलोफर मलिक पाठणार देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस !

 

मुंबई | अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप मलिक यांच्यावर करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकच खळबळ उडवून दिली होती. मात्र दुसरीकडे त्यांचे सर्व आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी फेटाळले आहेत. फडणवीस यांच्या विरोधात उद्या आरोपांचा ‘हायड्रोजन बॉम्ब’ फोडण्याची घोषणा केली मलिक यांनी केली आहे. त्याचबरोबर, ड्रग्ज प्रकरणात जावयावर केलेल्या आरोपांवरूनही फडणवीस यांना घेरण्याची तयारी नवाब मलिक यांनी केली आहे.

नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना आठ महिन्यांपूर्वी ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. तब्बल आठ महिन्यांच्या न्यायालयीन लढाईनंतर त्यांची सुटका झाली आहे. समीर खान यांना समीर वानखेडे यांनी खोट्या प्रकरणात अडकवले होते व त्यामागे भाजप असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता.

तसेच फडणवीस व त्यांच्या पत्नीचे ड्रग पेडलरशी संबंध असल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यांच्या आरोपांना उत्तर देताना फडणवीस यांनी मलिक यांचे जावई समीर खान यांच्या घरातून गांजा जप्त करण्यात आल्याचा आरोप केला होता. प्रत्यक्षात पंचनाम्यात व आरोपपत्रात असं काहीच नाही. असं असतानाही फडणवीस यांनी आरोप केल्यानं मलिक यांची मुलगी निलोफर मलिक ही फडणवीस यांना कायदेशीर नोटीस बजावणार आहे. स्वत: मलिक यांनी आजच्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

‘देवेंद्र फडणवीस हे कारण नसताना अवडंबर माजवत आहेत. बॉम्ब फोडण्याची भाषा त्यांनी केली होती, पण त्यांचे फटाके फुसके निघाले. ते केवळ बॉम्बस्फोट, दाऊद अशी नावं घेऊन माझी प्रतिमा मलिन करत आहेत. मागील पत्रकार परिषदेतही त्यांनी माझ्या जावयावर आरोप केले होते. माझ्या जावयाच्या घरातून गांजा जप्त केला गेला असं ते म्हणाले होते. माझी मुलगी त्यांना उद्याच नोटीस पाठवणार आहे,’ असं मलिक यांनी सांगितलं.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments