R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या ठाण्यात एसटीच्या संपामुळे प्रवाशांचे हाल !

ठाण्यात एसटीच्या संपामुळे प्रवाशांचे हाल !

 

ठाणे | एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीकरण करण्यात यावे या मागणीसाठी मागच्यानेक दिवसांपासून एसटी कर्मचारी आपल्या मागणायसाठी आंदोलन करत आहेत. त्यामुळे एसटीवर अवलंबून असलेल्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहे. प्रवाशांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे त्यांना अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत तर काही प्रवासी हे गावावरून आले आहेत. एसटी वाहतूक बंद असल्याने व त्याला शहरातील इतर माहिती नसल्याने त्यामुळे त्यांची देखील फरफट होत आहे. दिवाळीच्या काळात हा संप पुकारल्याने एसटीने वाहतूक करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते त्यामुळे त्याचा फटका प्रवाशांना बसला आहे.

जा प्रवाशांनी तिकिटाचे ऑनलाइन नोंदणी केली होती, त्या प्रवाशांना पूर्वसूचना न दिल्याने ते प्रवासी देखील बस डेपो परिसरात फेर्‍या मारताना दिसत आहेत. एस. टी. कर्मचाऱ्यांचे सरकारमध्ये विलनिकरण करावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे. दोन दिवसांपासून कर्मचारी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत.

या संपात महाराष्ट्रातील सर्व एसटी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा आणि लोकांना वेठीस धरू नये, असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आडून कोणी राजकारण करू नये, असेही त्यांनी म्हटले. कोर्टाच्या आदेशाचे कोणीही उल्लंघन करू नये. अन्यथा कारवाई करावी लागेल, असेही परब यांनी म्हटले. दिवाळीच्या काळात संप असल्याने प्रवाशांना याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे हा संप कधी संपला आणि प्रवाशांची वाहतूक कधी सुरळीत होईल याकडे सर्व प्रवाशांचे लक्ष आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments