R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश दिवाळीत कंदील उस्तवामुळे तरुणाईमध्ये उत्साह वाढला - नटे प्रतिष्टान

दिवाळीत कंदील उस्तवामुळे तरुणाईमध्ये उत्साह वाढला – नटे प्रतिष्टान

 

ठाणे दि. (प्रतिनिधी ) करोना संसर्गाचे सावट कमी झाल्यावर ठाण्यात प्रथमच शिवाई नगर मध्ये नटे प्रतिष्टान आणि शिवसेना पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक ५ मधील परिसर संपूर्ण कंदीलमय अर्थात कंदील लावून दिवाळी साजरी करण्यात आली. ठाण्यात उपवन फेस्टिवल नंतर पहिल्यांदाच यंदाच्या दिवाळीत हा कंदील उस्तव साजरा करण्यात आला . या उस्तवामुळे ठाण्यात सर्व स्तरावर कौतुक होत आहे

युवा पिढीला दिवाळी उस्तवाचे महत्व समजावे आणि प्रेरणा मिळावी यासाठी या उस्तवाचे आयोजन करण्यात आले अशी माहिती उस्तवाचे आयोजक नटे प्रतिष्टानचे अध्यक्ष संदीप नटे यांनी दिली .मागील वर्षी राज्यात करोनाचा प्रादुर्भाव ठाणे आणि मुंबईमध्ये सर्वाधिक होता,त्यामुळे दिवाळीचा सण साधेपणात साजरा करण्यात आला होता, मात्र यंदा दिवाळी हा पारंपारीक सण सणासारखा साजरा व्हावा, हा आम्ही या कंदील उस्तवाद्वारे नागरिकांना संदेश देत आहोत असेही संदीप नटे यांनी सांगितले.

या कंदील उस्तवाचे ७ वे वर्ष असून, यंदाचा कंदील उस्तव पाह्ण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने नागरिकांनी शिवाई नगर मध्ये हजेरी लावली तर विविध भागातील लोकांनी या उस्तवाबाबत शुभसंदेश दिला आहे तर काहींनी ह्या उस्तवामुळे ठाण्याची शोभा वाढली असल्याची प्रतिक्रिया दिली असेही संदीप नटे म्हणाले .

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

स्वच्छ सर्वेक्षणात बदलापूर अव्वल, राज्यात दुसरा,देशात १४वा क्रमांक

बदलापूर | स्वच्छ सर्वेक्षणात भरारी घेत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा राज्यातून दुसरा, तर देशातून १४वा क्रमांक पटकावला आहे. तीन वर्षांत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने स्वच्छ...

“निवडणुका झाल्या तरी जनतेचा कौल महाविकास आघाडीलाच मिळेल”

  मुंबई |  राज्यात आघाडीचे सरकार कोसळेल अशी भविष्यवाणी सतत विरोधक करताना दिसून येत आहे. त्यातच आता सरकार आज पडणार, उद्या पडणार अशी दिवास्वप्ने वीरोधकांनी...

पाचवी व सहावी रेल्वे मार्गिका लवकरच सेवेत

  डोंबिवली : मुंब्रा-कळवा दरम्यानच्या नव्या पाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पूर्ण झालेल्या कामांची अंतिम चाचपणी सुरू असून हे काम पूर्ण...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments