R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या प्रभू श्रीराम हे राजा दशरथाचे पुत्र नाहीत, उत्तरप्रदेशात भाजपच्या सहकारी पक्षाचं विधान...

प्रभू श्रीराम हे राजा दशरथाचे पुत्र नाहीत, उत्तरप्रदेशात भाजपच्या सहकारी पक्षाचं विधान !

 

मुंबई | प्रभू श्रीराम हे राजा दशरथाचे पुत्र नव्हते तर श्रृंगी ऋषी निषाद यांचे पुत्र होते, असे भयंकर वक्तव्य आमदार संजय निषाद यांनी केले आहे. आमदार निषाद यांच्या डोके फिरलेल्यासारख्या वक्तव्यावरून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशात भाजपची निषाद पक्षाबरोबर युती आहे. यावर आता भाजपचे काय म्हणणे आहे? असा सवाल उपस्थितीत होत आहे.

प्रयागराजमध्ये बोलताना संजय निषाद यांनी हे वक्तव्य केले. ‘राजा दशरथांना अपत्य नव्हते. श्रृंगी ऋषींनी त्यांना यज्ञ करायला सांगितले. दशरथांनी यज्ञ केला आणि आपल्या तिन्ही राणींना विशेष खीर दिली. आईने खीर खाल्यानंतर प्रभू श्रीरामांचा जन्म झाला. परंतु केवळ खीर खाल्याने कुणी गर्भवती होत नाही. त्यामुळे प्रभू श्रीराम हे राजा दशरथांचे पुत्र नाहीत. ते श्रृंगी ऋषी निषाद यांचे खरे पुत्र होते, अशी वायफळ बडबड संजय निषाद यांनी केली.

पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱया विधानसभा निवडणुकीत भाजपने निषाद पक्षाबरोबर युती केली आहे. निषाद पक्षाचे अध्यक्ष संजय निषाद हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. आमदार निषाद यांच्या भयंकर वक्तव्यावरून उत्तर प्रदेशात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. आयोध्येतील संत-महंत संतप्त झाले असून, निषाद यांचा निषेध केला आहे.

प्रभू श्रीरामाचा आणि त्यांचा भक्तांचा निषाद यांनी अपमान केला आहे. निषाद यांची भाषा अत्यंत आक्षेपार्ह आहे, अशी प्रतिक्रिया श्रीराम जन्मभुमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी व्यक्त केली. भाजपने निषाद पक्षासोबतची युती तोडावी, अशी मागणी संत-महंतांनी केली आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments