R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home बिजनेस नाण्यांनमध्येही होणार बदल! लवकरच येणार १,२,५,१० आणि २० रुपयांची नाणी

नाण्यांनमध्येही होणार बदल! लवकरच येणार १,२,५,१० आणि २० रुपयांची नाणी

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर२०१६ रोजी नोटबंदीची घोषणा केली होती. त्या दिवशी मध्यरात्रीपासून चलनातून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्या होत्या. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी नोटबंदी निर्णयाला 5 वर्ष पूर्ण झाली. यादरम्यान एक विशेष गोष्ट घडली आहे. अर्थ मंत्रालय लवकरच१,२,५,१०,आणि २० रुपयांची नाणी चलनात आणत आहे. ही नाणी आधिसूचित करण्यात आली आहेत.

यापूर्वी देखील अशा प्रकारच्या बातम्या आल्या होत्या. मात्र आता याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयानं १,२,५,,१० आणि २० रुपयांची नाणी अधिसूचित केली असून, त्याला १ रुपया, २ रुपये, ५ रुपये,१० रुपये आणि २० रुपये नियम २०२१ असं संबोधण्यात येईल. ज्या दिवशी ही अधिसूचना गॅझेटमध्ये प्रकाशित होईल, त्या दिवसापासून हा नवा नियम अस्तित्वात येणार आहे.

या नाण्यांच्या डिझाईनविषयीची माहिती अहवालात देण्यात आली आहे. त्यानुसार २० रुपयाच्या नाण्याच्या दर्शनी भागावर अशोक स्तंभावरील तीन सिंहांची राजमुद्रा असेल तसेच `सत्य मेव जयते` असं लिहिलेलं असेल. हिंदीत भारत आणि इंग्रजी भाषेत इंडिया असं लिहिलेलं असेल. मागील बाजूस `आजादी का अमृत महोत्सव` चा अधिकृत लोगो असेल. या लोगोखाली २० रुपये लिहिलेलं असेल. इंग्रजीत `75TH YEAR OF INDEPENDENCE` असं लिहिलेलं असेल. ज्यावर्षी हे नाणं तयार होईल, त्या वर्षाचा उल्लेख त्यावर असेल. १० रुपयाच्या नाण्याच्या मागील बाजूस `आजादी का अमृत महोत्सव` चा अधिकृत लोगो असेल.

या लोगोखाली १० रुपये लिहिलेलं असेल. इंग्रजीत `75TH YEAR OF INDEPENDENCE` असं लिहिलेलं असेल. ज्यावर्षी हे नाणं तयार होईल, त्या वर्षाचा उल्लेख त्यावर असेल. पुढील बाजूला अशोक स्तंभावरील राजमुद्रा असेल. तसेच `सत्यमेव जयते` असं लिहिलेलं असेल. हिदींत भारत आणि इंग्रजी भाषेत इंडिया असं लिहिलेलं असेल. १ रुपयाच्या नाण्याच्या पुढील बाजूला अशोक स्तंभावरील राजमुद्रा असेल आणि `सत्यमेव जयते` असं लिहिलेलं असेल. हिंदी भाषेत भारत तर इंग्रजी भाषेत इंडिया असं लिहिलेलं असेल.

मागील बाजूला `आजादी का अमृत महोत्सव` असा अधिकृत लोगो असेल. लोगोखाली 1 रुपया असं लिहिलेलं असेल. इंग्रजीत `75TH YEAR ऑफ INDEPENDENCE` लिहिलेलं असेल. ज्या वर्षी या नाण्याची निर्मिती केली जाईल, त्या वर्षाचा उल्लेख नाण्यावर असेल. २ रुपयाच्या नाण्याच्या मागील बाजूला `आजादी का अमृत महोत्सव` हा अधिकृत लोगो असेल. लोगो खाली २ रुपये असं लिहिलेलं असेल. तसेच इंग्रजीत `75TH YEAR OF INDEPENDENCE` लिहिलेलं असेल. ज्या वर्षी या नाण्याची निर्मिती केली जाईल त्यावर्षाचा उल्लेख नाण्यावर असेल.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

तब्बल ६८ वर्षानंतर टाटा ग्रुपने एअर इंडियाची मिळवली मालकी

  तब्बल ६८ वर्षांनंतर एअर इंडियाचे झाले खासगीकरण झाले असून एअर इंडियाची मालकी तब्बल ६७ वर्षांनी पुन्हा एकदा टाटा सन्सकडे जाणार आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार,...

 २४ तासात तब्बल ६०० कोटी रुपयांच्या Ola Electric Scooter ची विक्री,

नवी दिल्ली |  Ola Electric Scooter ला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत असून Ola चे फाउंडर आणि CEO भाविश अग्रवाल  यांनी Ola Electric ने विक्रीच्या...

सेन्सेक्स, निफ्टी विक्रमी उच्चांकावर, बाजारपेठा ताकदीने उघडल्या !

  मुंबई |  आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजार विक्रमी उच्चांकावर खुले झाले आहेत. सेन्सेक्स 59,400 तर निफ्टी 17,700 वर उघडला आहे. सध्या सेन्सेक्स 350...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments