R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या महाराष्ट्र सरकारवर आहे कर्जाचा डोंगर

महाराष्ट्र सरकारवर आहे कर्जाचा डोंगर

 

मुंबई प्रतिनिधी | बिकट आर्थिक परिस्थितीतून जात असलेल्या महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडून अतिरिक्त उत्पादन शुल्कासह पेट्रोल आणि डिझेलवरील वसूल केलेला ५० हजार कोटी रुपयांचा शेती-रस्ता कराचा राज्याचा हिस्सा मागितला आहे. महाराष्ट्रात पेट्रोलची मूळ किंमत ४०.९७ रुपये प्रतिलिटर असून, त्यावर केंद्राकडून ३२.९० रुपये उत्पादन शुल्क आणि उपकर आकारले जातात. तसेच राज्य सरकार इंधनावर ३०.२८ रुपये प्रतिलिटर मूल्यवर्धित कर (व्हॅट) आकारणी करते. पेट्रोल पंप ३.८६ रुपये कमिशन घेतात. असे एकूण मिळून सध्या इंधनाचे दर शंभरी पार केलेले आहेत.

त्याचप्रमाणे डिझेलची मूळ किंमत ४१.७९ रुपये प्रतिलिटर आहे. त्यावर केंद्र सरकार उत्पादन शुल्कासह उपकराची ३१.८० रुपये आकारणी करते. राज्य सरकारकडून २१.२८ रुपये प्रतिलिटर व्हॅटची आकारणी केली जाते. पेट्रोल पंप २.५८ रुपयांचे कमिशन घेतात. पेट्रोल आणि डिझेलवरील मूळ उत्पादन शुल्क प्रत्येकी फक्त १.४० आणि १.८० रुपये प्रतिलिटर वसूल केले जातात. गेल्या चार वर्षांपासून केंद्र सरकारकडून उर्वरित अतिरिक्त उत्पादन शुल्क आणि शेती-रस्त्यावरील उपकर वसूल केला जातो.

केंद्राकडून प्रतिलिटर वसूल करण्यात येणारा १ टक्का मूळ उत्पादन शुल्काचा हिस्सा राज्य सरकारला मिळतो. २०२०-२१ या वर्षात केंद्र सरकारकडून डिझेलवरील ३२,४३२ कोटी रुपये आणि पेट्रोलवरील १४,०३२ कोटी रुपये असे एकूण ४६,४६४ कोटी रुपयांचे उत्पादन शुल्क आणि उपकर वसूल केले आहेत. त्यापैकी केंद्राने राज्य सरकारला डिझेलवरील ३८३ कोटी रुपये आणि पेट्रोलवरील १३८ कोटी रुपये हस्तांतरित केले आहे, असे अर्थ मंत्रालयाच्या अधिकार्यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने अतिरिक्त उत्पादन शुल्क आणि रस्ता-शेती करामध्ये वाढ केली आहे. त्यापैकी एक टक्का हिस्सा राज्य सरकारांना वाटप केला जातो. गेल्या काही वर्षात केंद्राने इंधनावरील उत्पादन शुल्क आणि उपकरातही वाढ केली आहे. २०२०-२१ रोजी केंद्र सरकारने उत्पादन शुल्क आणि उपकरातून ३.३ लाख कोटी रुपये वसूल केले आहेत. पैकी डिझेल आणि पेट्रोलवरील महाराष्ट्राचा वाटा प्रत्येकी ११.६५ टक्के आणि ११.२५ टक्के होता.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments