R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या बेनामी संपत्ती बाळायला लावू नका, मलिक यांचा थेट अमृता फडणवीसांवर निशाणा

बेनामी संपत्ती बाळायला लावू नका, मलिक यांचा थेट अमृता फडणवीसांवर निशाणा

 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर आज सकाळी १० वाजता राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद आयोजित करून फडणवीसांचे पितळ उघड पडले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचेच ड्रग पेडलरशी संबंध असल्याचा दावा करणाऱ्या मलिक यांनी आज फडणवीसांचे अंडरवर्ल्डशी असलेले कनेक्शन समोर आणले. त्याचवेळी अमृता फडणवीस यांनी केलेल्या बेनामी संपत्तीच्या आरोपांनाही त्यांनी सडेतोड उत्तर दिलं.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सर्वप्रथम जोरदार टीका केली होती. तेव्हापासून आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीनं केलेल्या कथित बनावट कारवाया मलिक यांनी उजेडात आणल्या. त्यानंतर भाजप वानखेडेंच्या बाजूनं मैदानात उतरला.

मलिक यांचे जावई ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंच ते प्रामाणिक अधिकाऱ्यावर आरोप करत असल्याचं भाजपनं म्हटलं. त्याला उत्तर देताना मलिक यांनी फडणवीस व त्यांच्या पत्नीचे ड्रग पेडलरशी संबंध असल्याचा दावा केला होता. तेव्हापासून मलिक विरुद्ध फडणवीस असा सामना रंगला आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या अमृता फडणवीस यांनी अलीकडंच मलिक यांच्यावर निशाणा साधला होता. बेनामी आणि काळी संपत्ती वाचवण्यासाठी नवाब मलिक लोकांवर आरोप करताहेत, असं अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या. त्यांनाही नवाब मलिक यांनी आज उत्तर दिलं. बेनामी संपत्ती बाळायला लावू नका असं सडेतोड उत्तर मलिक यांनी मिसेस फडनिवासांना दिले आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

महानगरपालिका,नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

  मुंबई |  कोवीड-19 मुळे प्रशासकीय आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या, अशा परिस्थितीत पडताळणी समित्यांकडून केवळ जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्यामुळे उमेदवारांना, राखीव असलेल्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

Recent Comments