R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या बाळासाहेब ठाकरेंचा दाखला देत नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

बाळासाहेब ठाकरेंचा दाखला देत नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई | मंत्री नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते यांच्यातील वाद आता विकोपाला पोहचताना दिसून येत आहे. त्यातच १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत नवाब मलिक यांनी जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. नवाब मलिक आणि त्यांचा मुलगा फराज मलिक यांनी हा व्यवहार मान्य केला असला तरी त्यातील अंडरवर्ल्डशी कनेक्शनचा आरोप फेटाळून आला आहे.

दरम्यान, फडणवीस यांनी केलेल्या आरोपाचा धागा पकडत भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. नितेश राणे यांनी ट्वीट करुन उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. ९३च्या दंगलीत बाळासाहेबांनी हिंदूंना वाचवलं. आता त्यांचाच मुलगा ९३ दंगलीच्या आरोपींचा पार्टनर असलेल्या मंत्र्यांबरोबर मांडीला मांडी लावून सत्ता उपभोगतोय. खरं तर आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आली आहे. शिवसैनिक हे करणार का? नाहीतर मीच जाऊन शिंपडतो…’ असं ट्वीट करुन नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावलाय.

नवाब मलिक यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी आज सकाळी १० वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला करताना पाच ते सहा वेळा मुन्ना यादवचं नाव घेतलं. मुन्ना यादवचं नाव घेऊन त्यांनी फडणवीसांवर हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

Recent Comments