R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "अनधिकृत बांधकामातून पैसा ओरबाडतात, मग सोयी सुविधा का नाही?" .

“अनधिकृत बांधकामातून पैसा ओरबाडतात, मग सोयी सुविधा का नाही?” .

 

कल्याण | कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच विविध मुद्द्यावरून विरोधक राज्य सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे अशातच मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षावर निशाणा साधला आहे.

यावेळी अनधिकृत बांधकामाच्या विषयावरून मानपावर टीका केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचे अधिकारी अनधिकृत बांधकामातून पैसा ओरबाडतात.
मग २७ गावातील ग्रामीण भागात सोयी सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष का केले जाते?, असा संतप्त सवालआमदार राजू पाटील यांनी महापालिका प्रशासनाला विचारला आहे. पिसवली येथील गावदेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या विकासाकरिता मनसे आमदार पाटील यांनी आमदार निधीतून निधी दिला आहे.

भाजपचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोईर यांच्या प्रभागात मंजूर करण्यात आलेल्या डांबरी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी या परिसरातील मान्यवर उपस्थित होते. आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले की, २७ गावात बेकायदा बांधकामे केली जातात. ही बेकायदा न तोडण्यासाठी अधिकारी पैशाची मागणी करतात. पैसा उकळतात. अधिकारी बेकायदा बांधकामधारकांकडून पैसा उकळतात. त्याच महापालिकेचे प्रशासन या भागातील नागरी सोयीसुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments