R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home खेळ रहाणे आणि पुजाराच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह ? समिती घेऊ शकते मोठा निर्णय

रहाणे आणि पुजाराच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह ? समिती घेऊ शकते मोठा निर्णय

 

मुंबई | आगामी काळात भारतीय संघात मोठे बदल होण्य्ची चिन्ह दिसून येत आहे. प्रशिक्षकपदावरून रवी शास्त्री गेल्याने टी-२०, वनडे आणि कसोटी खेळाडूंच्या भूमिका बदलतील, असा अंदाज क्रिकेट जगतात वर्तवण्यात येत आहे. अशातच, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराच्या भवितव्याबाबत निवड समिती महत्त्वाचा निर्णय घेऊ शकते असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.

रोहित शर्मा टी-20 संघाचा कर्णधार झाला आहे. तो लवकरच एकदिवसीय सामन्यांची जबाबदारी स्वीकारणार असल्याचीही चर्चा आहे. याशिवाय कसोटी संघाच्या रणनितीत बदल होऊ शकतो. या अंतर्गत मधल्या फळीसाठी नवे चेहरे आजमावण्याचे काम होऊ शकते. न्यूझीलंडविरुद्धच्या भारतात होणाऱ्या कसोटी मालिकेत नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, असे मानले जात आहे. निवडकर्त्यांनी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराच्या भवितव्यावर वेळ घेण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा क्रिकेट जगतात केली जात आहे. हे दोन्ही खेळाडू अलीकडच्या काळात फॉर्मच्या कमतरतेशी झगडताना दिसत आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून त्यांचा खराब परफॉर्मन्स पाहायला मिळालेला आहे. आगामी सिरीजमध्ये टीम इंडियाच्या मधल्या फळीत बदल होऊ शकतात. शुभमन गिलला सलामीऐवजी मधल्या फळीत फलंदाजी करण्यास सांगितले जाऊ शकते. त्याचबरोबर रोहित शर्माला कसोटी संघाचा उपकर्णधार बनवले जाऊ शकते. सलामीवीर बनल्यानंतर त्याच्या खेळात कमालीची सुधारणा झाली आहे. इंग्लंड दौऱ्यावरही त्याने शतक झळकावले होते. याशिवाय मयंक अग्रवालचा पर्यायही मधल्या फळीसाठी आहे. संघासोबत हनुमा विहारीही आहे आणि तोही तळाला फलंदाजी करतो.

तथापि, मयंक आणि हनुमा या दोघांनाही अलीकडच्या काळात कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकलेले नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारत अ संघात बीसीसीआयने प्रियांक पांचाळ, सरफराज खान, बाबा अपराजित या मधल्या फळीतील फलंदाजांना ठेवले आहे. आगामी काळात या खेळाडूंना टीम इंडियाच्या निवडीत प्राधान्य मिळू शकते

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

आयपीएल फ्रँचायझींनी संघात कायम राखलेल्या खेळाडूंची नावं आली समोर

इंडियन प्रीमिअर लीग २०२२साठी मेगा ऑक्शन होणार आहे आणि त्याआधी ८ फ्रँचायझींना त्यांच्या ४ रिटेन खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सोपवण्याची आज अखेरची तारीख आहे. अहमदाबाद...

टीम इंडियाच्या टी20 टीमचा कॅप्टन रोहित शर्मानं त्याच्या नव्या इनिंगला केली सुरवात

  टीम इंडियाच्या टी20 टीमचा कॅप्टन रोहित शर्मानं त्याच्या नव्या इनिंगला केली सुरवात केली असून बुधवारी न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये टीम इंडियानं ५ विकेट्सनं विजय...

” सानिया मिर्झानं पाकिस्तानकडून खेळावं, आम्हाला तिची गरज नाही” नेटकऱ्यांचा संताप

  मुंबई | ऑस्ट्रेलियानं पाच विकेट्स व सहा चेंडू राखून पाकिस्तानवर विजय मिळवताना अंतिम फेरीत प्रवेश केला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदासाठी त्यांच्यासमोर आता न्यूझीलंडचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments