R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या नवाब मलिकांनी फडणवीसांशी संबंध जोडलेला रियाज भाटी राष्ट्रवादीचाच !

नवाब मलिकांनी फडणवीसांशी संबंध जोडलेला रियाज भाटी राष्ट्रवादीचाच !

 

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेतून नवाब मलिक यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यावर आज हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचं म्हणत नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेतली आणि देवेंद्र फडणवीसांवर अनेक गंभीर आरोप केले. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना गुंडांना मोठ्या पदावर बसवलं, असं म्हणत मलिकांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. यावर बोलताना भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक ट्वीट करत नवाब मलिकांना प्रत्युत्तर दिलंय.

केशव उपाध्ये ट्वीट करत म्हणाले की, “मी राष्ट्रवादीचाच – रियाज भाटी. १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली होती. तेव्हापासून रियाज भाटी राष्ट्रवादीचा पदाधिकारी होता. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जनरल सचिव म्हणून ते काम करत होता. पाहा काय म्हणतोय रियाज भाटी.” अशा आशयाचं ट्वीट करत एबीपी माझाचा एक व्हिडीओही ट्वीट केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना गुंडांना मोठ्या पदावर बसवलं, असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. हत्येचा आरोप असलेल्या मुन्ना यादवला फडणवीसांनी बांधकाम कामगार मंडळावर अध्यक्ष केलं. हैदर आझम बांगलादेशी लोकांना मुंबईत वसवण्याचं काम करतो, याच्या दुसऱ्या पत्नीवर खोट्या कागदपत्रांबाबत गुन्हा दाखल होत असतांना फडणवीस मुख्यमंत्री असांना त्यांच्या कार्यालयातून फोन गेला, असाही आरोप मलिकांनी केला.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments