R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या ठाण्यात आढळले नवीन ३८ रुग्ण !

ठाण्यात आढळले नवीन ३८ रुग्ण !

 

ठाणे | ठाणे महापालिका हद्दीतील कोरोना हॉट स्पॉट संपुष्टात आले आहेत. सर्वाधिक १४ रूग्ण माजिवडे-मानपाडा आणि ११जण वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात सापडले आहेत. लोकमान्य-सावरकर नगर आणि मुंब्रा प्रभाग समितीमध्ये शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. पाच रूग्ण उथळसर, तीन जण वागळे आणि दोन रूग्ण नौपाडा-कोपरी प्रभाग समिती परिसरात आढळले आहेत. प्रत्येकी एका रुग्णाची भर दिवा आणि कळवा प्रभाग समिती क्षेत्रात पडली आहे.

विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी ५२जण कोरोनामुक्त झाले असून आत्तापर्यंत एक लाख ३८ हजार ७६२जण ठणठणीत बरे झाले आहेत. रुग्णालयात आणि घरी ३७८ जणांवर उपचार सुरू आहेत.आज एकाचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत दोन हजार १०४जण दगावले आहेत. महापालिका प्रशासनाने काल शहरातील दोन हजार ८०६ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये ३८जण बाधित मिळाले आहेत. आत्तापर्यंत २० लाख ७६ हजार ६३९ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ४१ हजार २४४जण बाधित सापडले आहेत.

महापालिका प्रशासनाने काल शहरातील दोन हजार ८०६ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये ३८जण बाधित मिळाले आहेत. आत्तापर्यंत २० लाख ७६ हजार ६३९ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ४१ हजार २४४जण बाधित सापडले आहेत.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments