R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया 'बळीचा बकरा शोधू नका, नवाब मालिकांच्या मुलीचा फडणवीसांना टोला

‘बळीचा बकरा शोधू नका, नवाब मालिकांच्या मुलीचा फडणवीसांना टोला

 

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत आरोप केल्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सूचक टि्वट केलं. फडणवीसांनी केलेल्या टि्वटमध्ये कोणाचही नाव घेतलं नव्हतं. आता नवाब मलिकांची मुलगी निलोफर मलिकने देवेंद्र फडणवीसांच्या त्याच टि्वटला उत्तर दिलं आहे. “आयुष्यात एक बळीचा बकरा शोधू नका. आपण केलेल्या चुकांची फळ भोगायला तयार राहा” असं निलोफरने म्हटलं आहे. ‘आजच्या दिवसाचा विचार’ असं म्हणत त्यांनी जॉर्ज बनार्ड शॉ यांचा कोट टि्वट केला. “डुकराशी कुस्ती खेळू नये, हे मी आधीच शिकलो आहे. तुमच्या अंगाला घाण लागते, पण डुकराला ते आवडतं” असं फडणवीस यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं होतं.

सध्या राज्यात नवाब मलिक विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा सामना रंगला आहे. दोघांनी परस्परांना अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. दोघांमध्ये सुरु असलेल्या या वाकयुद्धात फडणवीसांची पत्नी अमृता आणि नवाब मलिकांची मुलगी निलोफर सुद्धा सहभागी झाली आहे. काल रात्री अमृता फडणवीस यांनी नवाब मलिकांवर टि्वटमधून निशाणा साधला.

तसेच अमृता फडणवीस यांनी नवाब मलिकांना ‘बिगडे नवाब’ म्हटलं. प्रत्येकवेळी पत्रकार परिषद घेऊन खोट्या गोष्टी आम्हाला सांगितल्या. काळी कमाई आणि जावयाला वाचवणं एवढच यांच लक्ष्य आहे, अशी टीका अमृता फडणवीस यांनी केली. त्यावर निलोफर मलिक यांनी टि्वट करुन उत्तर दिलं. “कपाटामध्ये लपवलेले सांगाडे नसतील, तर त्यांना पत्रकार परिषदेची चिंता वाटणार नाही. जेव्हा तुमची सत्याची बाजू असते, तेव्हा क्वचितच तुम्हाला भीती वाटते. त्यांचा द्वेषपूर्ण हेतू असेल, तर ते उघडे पडतील. महाराष्ट्राची प्रगती आणि विकास हाच आमचा ध्यास आहे” असं निलोफर मलिक यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

 

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

लेकाच्या लग्नात गुलाबराव पाटलांचा भन्नाट डान्स होत आहे व्हिडिओ वायरल

  जळगाव | शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा डान्सचा व्हिडीओ समोर आला होता. राऊत यांनी मुलीच्या लग्नातील संगीत कार्यक्रमात...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

Recent Comments