R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या नवाब मलिकांविरोधातील सत्य जनतेसमोर आणणार, हाजी अराफत यांचे आव्हान

नवाब मलिकांविरोधातील सत्य जनतेसमोर आणणार, हाजी अराफत यांचे आव्हान

 

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. तसेच फडणवीसांनी हाजी अराफतच्या भावाचे प्रकरण दाबले असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. यावर अल्पसंख्यांक अध्यक्ष हाजी अराफत यांनी प्रत्युत्तर दिलं असून मलिकांची मानसिक स्थिती बरी नसल्याचे म्हटलं आहे.

भाजप नेते हाजी अराफत यांच्या भावाला बनावट नोट प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणाला देवेंद्र फडणवीस यांनी दाबले असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. यावर हाजी अराफत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी संपर्क साधताना आरोप फेटाळले आहेत. हाजी अराफत म्हणाले की, नवाब मलिकांचे मानसिक संतुलन ठीक नाही आहे. त्यांच्या घरातील लोकांना विनंती आहे की, त्यांना चांगल्या डॉक्टरांना दाखवण्यात यावे.

दरम्यान सिनेमा नवाब मलिक यांनी सुरु केला आहे परंतु त्याचा अंत मी करणार, कोणाची मुलगी कोणाला घेऊन पळाली, कोणाचा मुलगा गेला? कोणाचे संबंध अंडरवर्ल्डशी आहे? या सगळ्या गोष्टी पत्रकार परिषद घेऊन सांगणार असल्याचा इशारा हाजी अराफत यांनी दिला आहे. तसेच नवाब मलिकांना सांगू इच्छितो की, त्यांना तोंड दाखवण्याची जागा राहणार नाही. आता नवाब मलिकांना मीडियाची सवय झाली आहे. त्यांना सकाळी आणि संध्याकाळी मीडिया पाहिजे परंतु काही दिवसानंतर मीडियापासून पळतील असे हाजी अराफत म्हणाले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

Recent Comments