R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'गुड गोईंग'; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी केले नवाब मलिक यांचे कौतुक

‘गुड गोईंग’; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी केले नवाब मलिक यांचे कौतुक

 

मुंबई | राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करताना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. याच वादामुळे संपूर्ण भाजपा नेते नवाब मलिक यांच्यावर तुटून पडले होते. तसेच मलिक यांचे अंडरवर्ल्ड दोन दाऊदशी संबंध असल्याचे विधान विरोधकांनी केले होते.

तर दुसरीकडे मलिक यांचे खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री मंडळाच्या बैठकीत कौतुक केले आहे. ‘गुड गोईंग’ या शब्दात त्यांनी नवाब मलिक यांचे कौतुक केल्याची माहिती आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत नवाब मलिक यांच्याविषयी मुख्यमंत्र्यांनी ही टिप्पणी केली. बहुतेक मंत्र्यांनी नवाब मलिक यांचे कौतुक करून त्यांच्या मोहिमेला पाठिंबा दिला.

तसेच यावेळी नाशिक जिल्ह्यात देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या एका वीज कंत्राट घोटाळ्याची चौकशी करण्याचे आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहे. या संदर्भात राऊत यांच्याकडे एक व्यक्तिगत तक्रार आली होती. एक काम केल्याचे दोनवेळा दाखविण्यात आले आणि अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांशी संगनमत करून मोठ्या प्रमाणात निधी लाटला, अशी ही तक्रार आहे. पायाभूत सुविधा टप्पा दोन अंतर्गत हे काम करण्यात आले होते.

फडणवीस सरकारच्या काळात ऊर्जा विभागात झालेल्या सहा हजार कोटी रुपयांच्या कामांची चौकशी करण्याचे आदेश राऊत यांनी दिल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दाखवले होते. मात्र, ऊर्जा विभागाच्या अधिकृत सूत्रांनी त्याचा इन्कार केला. हे प्रकरण केवळ नाशिकमधील एका कामाशी संबंधित असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments