R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या ठाणे जिह्याची पाणीटंचाई दूर करण्यासाठी मेगा प्लॅन

ठाणे जिह्याची पाणीटंचाई दूर करण्यासाठी मेगा प्लॅन

 

ठाणे | ठाणे जिल्हातील अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी कपातीचे संकट उभे राहिले आहे. ‘धरण उशाला, कोरड घशाला’ अशी काहीशी अवस्था ठाणे जिल्हावासीयांची झाली आहे. जिल्ह्यातील सहा महापलिका आणि ग्रामीण भागातील पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. या समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई सोडवण्यासाठी ॲक्शन प्लॅन आखण्यास सुरुवात केली आहे.

यासाठी तीन टप्प्यांत आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून यामध्ये जुन्या जीर्ण जलवाहिन्या बदलणे, खारे पाणी गोडे करणे, धरणांचे पाणी इतर ठिकाणी वळवणे, काळू धरणाचे काम मार्गी लावणे आदी कामे केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. ठाणे जिल्हा हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. भातसा, तानसा, मोडकसागर आणि बारवी अशी मोठी धरणे जिल्ह्यात आहेत.

या धरणांच्या माध्यमातून मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी आदी शहरांची तहान भागवली जाते. असे असले तरी महापालिका क्षेत्रांसह ग्रामीण भागातील अनेक गावपाड्यांमध्ये पाणीटंचाई जाणवते. ठाणे जिल्ह्यातील पाणीटंचाईसंदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी टास्क फोर्सची स्थापना केली. या टास्क फोर्सची नुकतीच पहिली बैठक जिल्ह्याधिकारी कार्यालयात पार पडली.

या वेळी ठाणे व पालघर जिल्ह्यांतील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’प्रमाणे मुंबई महानगर प्रदेश हद्दीतील धरणांचा वॉटर ग्रीड करता येईल का, तसेच २०५० पर्यंत वाढणाऱ्या लोकसंख्येच्या मानाने पाण्याचे नियोजन कसे करता येईल याबाबतची चर्चा बैठकीत झाली. त्यानुसार आखणी करण्याच्या सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांनी बैठकीत केल्या होत्या.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाण्याचे नियोजन करण्याचे आणि आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी येथील शेततळी आणि तलावांचा कशा पद्धतीने वापर करता येऊ शकतो, याचा विचार करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. पाणी नियोजनाची बैठक येत्या तीन आठवड्यांत पुन्हा होणार आहे. या बैठकीत पाणी नियोजनाचा आराखडा सादर करण्यात येणार असून यासाठी किती खर्च अपेक्षित आहे, त्याची माहितीदेखील दिली जाणार आहे. त्यानंतर हा आराखडा सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी दिली.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments