R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'तो' जाहीरनामा हर्बल वनस्पती न घेता दिला होता ना? सुधीर मुनगंटीवार यांचा...

‘तो’ जाहीरनामा हर्बल वनस्पती न घेता दिला होता ना? सुधीर मुनगंटीवार यांचा आघाडी सरकारला टोला

 

राज्यात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शीतयुद्ध सुरु झाले आहे. त्यातच याच मुद्द्यावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. आता त्या पाठोपाठ भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीनं शपथनामा जारी केला. त्यात एसटी कामगारांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा देऊन त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांसारखं वेतन देऊ असं जाहीर नाम्यात म्हटलं होतं. मग हा जाहीरनामा कुठलीही हर्बल वनस्पती घेऊन बनवला नव्हता ना? याचं उत्तर महाविकास आघाडीच्या सरकारने द्यावं अशी मागणी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

पुढे मुनगंटीवार म्हणाले की, मविआ सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर लोकं सरकारला भस्मसात करतील. ज्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येईल त्यांना भाजपा सरकार आल्यास त्यांना पुन्हा सेवेत घेऊन त्यांना दुपटीनं आर्थिक नुकसान भरपाई देईल. सरकारचं डोकं ठिकाणावर असणं गरजेचे आहे. कामगारांच्या मागण्या पूर्ण करताना आर्थिक गणित समजत नसेल तर ते आम्ही समजवायला तयार आहोत. १२ हजार कोटींची आर्थिक तूट असल्याचं परिवहन मंत्री बोलले. पण गेल्या दीड वर्षात ६ हजार कोटींचा तोटा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झाला हे सांगायला मंत्री विसरले असा टोला मुनगंटीवारांनी अनिल परब यांना लगावला.

तसेच बेस्ट कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांना पगार जास्त मग एसटी कर्मचाऱ्यांना वेतन कमी का? हा भेदभाव थांबवण्याचं काम सरकारने केले पाहिजे. ३६५ दिवस केवळ महाविकास आघाडी राजकारण करत आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था खराब झाली आहे. शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही. आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये गोंधळ होतोय. विद्यार्थ्यांचे नुकसान केलं जातंय. राजकारण करू नका जो शब्द तुम्ही जाहिरनाम्यात दिला त्यानुसार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा असं आवाहन सुधीर मुनगंटीवारांनी सरकारला केले आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments