R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या भारतात तयार झालेल्या Anti-Covid Pills ला लवकरच मिळू शकते परवानगी !

भारतात तयार झालेल्या Anti-Covid Pills ला लवकरच मिळू शकते परवानगी !

 

नवी दिल्ली | सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी COVID-19 रुग्णांच्या उपचारासाठी मर्कची अँटीव्हायरल गोळी मोलनुपिरावीरला काही दिवसांत आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळू शकते. कोविड स्ट्रॅटेजी ग्रुप, CSIR चे अध्यक्ष डॉ. राम विश्वकर्मा यांनी एका वृत्त वाहिनीला ही माहिती दिली. या संदर्भात बोलताना ते म्हणाले, ही गोळी अशा लोकांसाठी आहे, ज्यांना गंभीर COVID-19 आहे किंवा रुग्णालयात दाखल होण्याचा धोका आहे. या गोळीशिवाय फायझरची गोळी पॅक्सलोविडला आणखी काही वेळ लागू शकतो. या दोन कंपन्यांच्या गोळ्या बाजारात आल्यानंतर मोठा फरक पडेल आणि महामारी संपवण्याच्या दिशेने मोठी वाटचाल करू. ही गोळी लसीकरणापेक्षाही मोठी परिणामकारक सिद्ध होऊ शकते.

ते पुढे म्हणाले की, येणाऱ्या दिवसात मोलनुपिरावीर लवकरच आपल्यासाठी उपलब्ध होईल. औषध निर्मात्यांसोबत पाच कंपन्या काम करत आहेत. मला वाटतं की कोणत्याही क्षणी यो गोळ्यांच्या वापरासाठी मान्यता मिळेल. ब्रिटनमध्ये या गोळीच्या वापरण्यास परवानगी दिल्यानंतर एसईसी त्यावर लक्ष ठेवत आहे. अशा स्थितीत लवकरच भारतातही या गोळीच्या वापरासाठी परवानगी मिळेल. येत्या महिनाभरात यावर निर्णय घेतला जाऊ शकतो, असे ते म्हणाले.

सुरुवातीला या गोळीची किंमत 2000 ते 3000 हजार किंवा संपूर्ण उपचारासाठी 4000 रुपये असू शकते. मात्र, नंतर ही किंमत 500 ते 600 किंवा 1,000 रुपयांपर्यंत खाली येईल.
Pfizer ने एक निवेदन जारी केले आहे की, क्लिनिकल चाचण्यांनुसार त्यांची Paxlovid गोळी गंभीर रुग्णांमध्ये हॉस्पिटलायझेशन किंवा मृत्यूचा धोका 89 टक्क्यांनी कमी करते. मर्कने यापूर्वीच पाच कंपन्यांशी करार केला आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments