R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'नवाब मलिक यांचे ड्रग्स केसमध्ये अटक झालेल्या आरोपीशी संबंध', मोहित कंबोज यांचे...

‘नवाब मलिक यांचे ड्रग्स केसमध्ये अटक झालेल्या आरोपीशी संबंध’, मोहित कंबोज यांचे गंभीर आरोप

 

मुंबई | ड्रग्स प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच मोहित कंबोज यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. आर्यन खानचे खंडणीसाठी अपहरण झाले होते, तसेच त्याचे मास्टर माईंड मोहित कंबोज होते, असा दावा मलिक यांनी केला होता. दरम्यान, आता मोहित कंबोज यांनीही नवाब मलिक यांचे ड्रग्स पेडलर आणि ड्रग माफियांशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

भाजपा नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांचे काही फोटो ट्विटर अकाउनवरून शेअर करत २०१८ मध्ये ड्रग्स केसमध्ये अटक करण्यात आलेल्या सोहेल सय्यद उर्फ सुनील निकम याच्याशी त्यांचा काय संबंध आहे, याचे उत्तर देण्याचे आव्हान दिले आहे. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये मोहित कंबोज यांनी विचारले की, हॅलो कोण, ओळखा हा कोण? सोहेल सय्यद ऊर्फ सुनील निकम. याला २०१८मध्ये अटक करण्यात आले होते. त्याचे नवाब मलिक यांच्याशी काय संबंध आहेत? त्याचे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसशी काय संबंध आहेत, असा सवाल मोहित कंबोज यांनी या ट्विटमधून विचारला आहे.

याबाबत मोहित कंबोज यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मोहित कंबोज म्हणाले की, सोहेल सय्यद ऊर्फ सुनील निकम याला २०१८ मध्ये ड्रग्स केसमध्ये अटक करण्यात आले होते. माझा स्पष्ट आणि थेट प्रश्न आहे की, नवाब मलिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी याचा काय संबंध आहे. ड्रग पेडलर आणि ड्रग माफिया ज्यांच्यावर गेल्या काही वर्षांत मुंबईमध्ये कारवाई कारवाई झाली, त्या सर्वांचे कनेक्शन वळून वळून कुर्ल्यापर्यंत आणि नूर मंजिलपर्यंत का जाते. याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. नाव बदलून मुंबई आणि महाराष्ट्रात ड्रग्सचा धंदा करायचा, याच्याशी काय संबंध होते याचं उत्तर नवाब मलिक यांनी द्यावं, असे आव्हान मोहित कंबोज यांनी दिले.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments