R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home खेळ " सानिया मिर्झानं पाकिस्तानकडून खेळावं, आम्हाला तिची गरज नाही" नेटकऱ्यांचा संताप

” सानिया मिर्झानं पाकिस्तानकडून खेळावं, आम्हाला तिची गरज नाही” नेटकऱ्यांचा संताप

 

मुंबई | ऑस्ट्रेलियानं पाच विकेट्स व सहा चेंडू राखून पाकिस्तानवर विजय मिळवताना अंतिम फेरीत प्रवेश केला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदासाठी त्यांच्यासमोर आता न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. २००९ची चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१५चा वन डे वर्ल्ड कप आणि आता २०२१चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जेतेपदासाठी हे कट्टर प्रतिस्पर्धी समोरासमोर येणार आहेत. पण, या सामन्यात नेटिझन्सकडून भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा नेटकऱ्यांच्या रडारवर आहे.

पाकिस्तानकडून बाबर-रिझवान यांच्या ७१ धावांच्या भागीदारीनंतर रिझवान व जमान यांनी अखेरच्या १० षटकांत १०५ धावा कुटल्या. पाकिस्तानचा कर्णधार ३९ धावांवर माघारी परतला. रिझवान ५२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ६७ धावांवर माघारी परतला. त्यानंतर जमान ३२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५५ धावांवर नाबाद राहिला. पाकिस्ताननं ४ बाद १७६ धावा कुटल्या.

ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. अॅरोन फिंच याला भोपळ्यावर माघारी परतला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी ऑसींचा डाव सावरला. वॉर्नर ३० चेंडूंत ३ चौकार व ३ षटकार मारून ४९ धावांवर माघारी परतला. ऑस्ट्रेलियाला अखेरच्या सहा षटकांत ६८ धावा करायच्या होत्या. मॅथ्यू वेड व मार्कस स्टॉयनिस यांनी ऑस्ट्रेलियाला वेड १७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ४१ धावा केल्या,तर स्टॉयनिस ४० धावांवर नाबाद राहिला. शाहिननं १९वे षटक फेकले. शादाबनं २६ धावांत ४ विकेट्स घेतल्या. याही सामन्यात सानिया मिर्झा पती शोएब मलिका याला चिअर करण्यासाठी पोहोचली होती आणि तिला पाकिस्तानसाठी टाळ्या वाजवताना पाहून नेटिझन्स भडकले अन् तिला ट्रोल केले.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

आयपीएल फ्रँचायझींनी संघात कायम राखलेल्या खेळाडूंची नावं आली समोर

इंडियन प्रीमिअर लीग २०२२साठी मेगा ऑक्शन होणार आहे आणि त्याआधी ८ फ्रँचायझींना त्यांच्या ४ रिटेन खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सोपवण्याची आज अखेरची तारीख आहे. अहमदाबाद...

टीम इंडियाच्या टी20 टीमचा कॅप्टन रोहित शर्मानं त्याच्या नव्या इनिंगला केली सुरवात

  टीम इंडियाच्या टी20 टीमचा कॅप्टन रोहित शर्मानं त्याच्या नव्या इनिंगला केली सुरवात केली असून बुधवारी न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये टीम इंडियानं ५ विकेट्सनं विजय...

बायकोच्या वाढदिवसानिमित्त सचिन तेंडुलकरने ठाकर भोजनालयात जाऊन घेतला गुजराती थाळीचा आस्वाद !

  मुंबई | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुलाखतींमध्ये आपलं माशांवर अर्थात नॉनव्हेज जेवणावर असलेले प्रेम अनेक माध्यमांवर बोलून दाखवलं आहे. अस्सल नॉन व्हेज खाणारा सचिन...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments