R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या एसटी बंद असल्यामुळे ठाण्यात प्रवाशांच्या खिशाला कात्री

एसटी बंद असल्यामुळे ठाण्यात प्रवाशांच्या खिशाला कात्री

 

ठाणे | एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी मागच्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. त्यातच हे आंदोलन आता चिघळताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे ठाणे प्रादेशिक परिवहन विभागातर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी खासगी बस सोडण्यास सुरुवात करण्यात आल्या आहेत.

ठाण्यातील खोपट आणि वंदना या बस स्थानकांतून नाशिक, पुणे, सातारा आणि हैद्राबाद या मार्गावर जाण्यासाठी या बस सुरू करण्यात आल्या असल्या, तरी या प्रवासाचे भाडे वाढीव असल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री बसत आहे. भिवंडी आणि शहापूर या बसस्थानकांतून ठाणे, वाडा आणि र्वांशद या मार्गावर खासगी बसगाड्या सोडण्यात येत आहेत. एसटीच्या साध्या तिकीट दरापेक्षा निमआराम, शिवशाही या बसगाड्यांप्रमाणेच या खासगी बस सेवेतून दर आकारले जात आहेत. राज्यभरात मागील दोन आठवड्यांपासून राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

या पार्श्वभूमीवर रविवारपासून ठाणे जिल्ह्यातील ठाणे १, ठाणे २, कल्याण, विठ्ठलवाडी, भिवंडी, वाडा, शहापूर आणि मुरबाड या आठही आगारांतील एसटी सेवा पूर्णपणे ठप्प झाली. प्रवाशांचे अधिक हाल होऊ नये यासाठी ठाणे जिल्ह्यात बुधवारपासून ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून खासगी बस सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. पहिल्याच दिवशी ठाण्यातील खोपट आणि वंदना या बसस्थानकातून नाशिक, पुणे, सातारा, कराड आणि हैदराबाद या भागात जाणाऱ्या १० खासगी बसगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments