R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या KDMC निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण- डोंबिवली रस्तेकामांना आरंभ

KDMC निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण- डोंबिवली रस्तेकामांना आरंभ

 

डोंबिवली | कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरातील नव्या रस्त्यांच्या कामांना बुधवारपासून सुरुवात करण्यात आली. राज्य सरकारने मंजूर केलेल्या निधीपैकी १५ कोटी रुपयांची रस्तेकामे करण्यात येणार आहेत. डोंबिवली पूर्व, पश्चिम भागातील रस्ते पहिल्या टप्प्यात यासाठी निवडण्यात आले आहेत. या दोन्ही विभागांमध्ये भाजपचे प्राबल्य असल्याने शिवसेनेने रस्तेकामांच्या माध्यमातून या भागात भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा रंगली आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने कल्याण-डोंबिवली पालिकेसाठी ३६१ कोटी रुपयांच्या खर्चाचे ३२ रस्ते मंजूर केले आहेत. यामधील पाच कोटी रुपयांपेक्षा कमी तरतुदीचे सात रस्ते महापालिका करणार आहे. उर्वरित रस्ते प्राधिकरण करणार आहे. या कामांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार एजन्सी नियुक्ती केली आहे. या एजन्सीकडून रस्ते कामाचे विस्तृत आराखडे प्राप्त झाले की तात्काळ पालिका, प्राधिकरण निविदा प्रक्रिया पूर्ण करून ठेकेदार नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती या वेळी देण्यात आली.

शिवसेना-भाजपची युती असल्याच्या काळापासूनच डोंबिवलीत भाजपला मानणारा एक मोठा वर्ग आहे. पाच वर्षांपूवी झालेल्या महापालिका निवडणुकीत डोंबिवलीत मोठ्या प्रमाणावर भाजपचे नगरसेवक निवडून आले. डोंबिवलीच्या जोरावर भाजपने शिवसेनेपुढे आव्हान उभे केल्याचे चित्र यामुळे निर्माण झाले.

कल्याण पूर्व आणि पश्चिमेत शिवसेनेला मिळालेल्या जागांच्या जोरावर या पक्षाची सत्ता महापालिकेत आली. विधानसभा निवडणुकीत भाजपचे रवींद्र चव्हाण मोठ्या मताधिक्याने या भागातून निवडून आले आहेत. या वेळी भाजप आणि मनसेचे गणित जुळल्यास डोंबिवली आणि काही प्रमाणात ग्रामीण पट्ट्यातून शिवसेनेपुढे आव्हान उभे राहण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीकडे लक्ष केंद्रित केले आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments