R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति पुणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून पक्षबांधणीसाठी नियुक्त्या !

पुणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून पक्षबांधणीसाठी नियुक्त्या !

 

पुणे | पुणे महानगर पालिका निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोचेबंधी सुरु केली आहे. त्यातच पुढच्या वर्षी होणाऱ्या प्रमुख महापालिका, जिल्हा परिषदा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून या पार्श्‍वभूमीवर पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हानिहाय प्रभारी तसेच सहप्रभारींच्या नियुक्‍त्या केल्या आहेत.

या नियुक्‍त्यांमध्ये राज्य कार्यकारिणीत असलेल्या पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांकडे पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांची प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तर पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या प्रभारीपदी संजय राठोड यांची निवड करण्यात आली. सहप्रभारी पदाची जबाबदारी शाह आलम शेख, तर विजय बारसे यांच्याकडे देण्यात आली आहे.

तर प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्याकडे सोलापूर ग्रामीण, अरविंद शिंदे यांच्याकडे सोलापूर शहर, संजय बालगुडेयांच्याकडे सांगली ग्रामीण आणि शहर, ऍड. अभय छाजेड यांच्याकडे कोल्हापूर ग्रामीण आणि शहर, श्रीरंग चव्हाण पाटील यांच्याकडे साताऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच संपूर्ण जिल्यात काँग्रेस अधिक-अधिक मजबूत कार्याचे आदेश देण्यात आले आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

महाराष्ट्र सहकारी बँकप्रकरणी ईडीकडून या मंत्र्यांची तब्बल सात तास चौकशी

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यातच आता मंगळवारी आणखी एका नावाची भर पडली. ईडीकडून मंगळवारी महाविकास...

महाविकास आघाडी सरकारने OBC समाजाची फावणूक केली – चंद्रकांत पाटील

  महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे दुर्लक्ष करून केवळ अध्यादेश काढून ओबीसींना राजकीय आरक्षण दिल्यामुळे तो अध्यादेश न्यायालयात टिकला नाही आणि सरकारने ओबीसी समाजाची...

ममता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटू शकणार नाहीत

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात त्या शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments