R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या राष्ट्रवादी काँग्रेसची ED कार्यालयाकडे कडे धाव !

राष्ट्रवादी काँग्रेसची ED कार्यालयाकडे कडे धाव !

 

मुंबई | ड्रग्ज प्रकरणावरून एनसीबीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस ईडीविरोधातही आक्रमक होणार असल्याचे म्हटले जात आहे. राष्ट्रवादीचे पक्षाचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी तसे संकेत दिले आहेत. भाजपमधील लोकांवर गुन्हे दाखल होऊनही कारवाई का झाली नाही, याचा ईडीला जाब विचारणार असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या केंद्रीय तपास संस्था आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष निर्माण झाले. केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप याआधीदेखील महविकास आघाडीकरून करण्यात आला होता.

मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी केलेल्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत आरोपांची मालिका सुरू केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने ईडीलाबी जाब विचारण्याची तयारी केली आहे. वक्फ बोर्डाशी संबंधित घोटाळा प्रकरणी ईडीने आज पुण्यात सात ठिकाणी छापे घातले. या छाप्यानंतर नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण दिले. वक्फ बोर्डातील कामकाजाच पारदर्शीपणा आणण्यासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मलिक म्हणाले की, आमच्या क्लिन अप अभियानात ईडीचं सहकार्य मिळत आहे, याचे स्वागत आहे. ईडीला सहकार्य करण्याची आमची तयारी आहे. मात्र, बदनामी करण्याचा डाव असल्यास ते चूक आहे. हेतू प्रामाणिक असेल तर आम्ही सहकार्य करु, पण बातम्या पेरून माझी प्रतिमा मलीन करु शकत नाही, असेही नवाब मलिक यांनी म्हटले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments