R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या भंगारवाल्याची संपत्ती कोट्यवधींची कशी झाली? आज खुलासा करणार

भंगारवाल्याची संपत्ती कोट्यवधींची कशी झाली? आज खुलासा करणार

 

मुंबई | ड्रग्ज केस प्रकरणावरुन अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि भाजप नेत्यांमध्ये दररोज आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरूच आहे. नवाब मलिक आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील आरोप प्रत्यारोपामध्ये आता भाजप नेते हाजी अराफत शेख यांचे नाव घेतल्यामुळे एंट्री झाली आहे. नवाब मलिक यांच्याविरोधात पुरावे देण्यासाठी पत्रकार परिषद घेणार असल्याचं हाजी अराफत शेख यांनी सांगितलं आहे. शुक्रवारी, दुपारी तीन वाजता त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये ते राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांचे उत्तर देत, खळबळजनक खुलासे करणार असल्याचं समजतेय.

अल्पसंख्यांक समाजाला अडीच वर्षे वेठीस धरून अधोगतीच्या मार्गावर नेणारे भ्रष्ट मंत्री नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मन-मानी पद्धतीने केलेली कामे, वक्फ बोर्डाची जागा हडपने, गैरव्यवहार करने व स्वतःच्या स्वार्थापोटी वक्फ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणे यासंबंधी खुलासे करणार असल्याचं हाजी अराफत शेख यांनी सांगितलं. सुरुवात नवाब मलिक यांनी केलीये, अखेर हाजी अराफत शेख करेल, असं ते म्हणाले. आजपासून मी पत्रकार परिषदांचं सत्र सुरू करणार आहे.

तसेच नवाब मलिकांसोबत कोण-कोण आहेत? हे समोर आणणार. आज अल्पसंख्याक समाजाच्या मुद्द्यावर दुपारी मुंबईत पहिली पत्रकार परिषद होईल. त्यानंतर दोन दिवसांनी मलिकांचे अंडरवल्ड कनेक्शन समोर आणणार. त्यानंतर भंगारवाल्याची संपत्ती कोट्यवधींची कशी झाली, याचा खुलासा करणार आहे. मग चरस मलिक कोणाला म्हणतात, यावर भाष्य करेन. तसेच कोणाची मुलगी कोणासोबत पळून गेली, कोणाचा मुलगा रशियाच्या मुलीला घेऊन पसार झाला. हे समोर आणणार आहे असं वक्तव्य हाजी अराफत शेख यांनी केलं आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments