R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या औरंगाबादेत नगरसेवकाच्या भावाच्या गाडीत आढळल्या नशेच्या २६० गोळ्या

औरंगाबादेत नगरसेवकाच्या भावाच्या गाडीत आढळल्या नशेच्या २६० गोळ्या

 

ड्रुग्स प्रकरणाच्या मुद्द्यवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना आता दुसरीकडे अशीच काहीशी घटना औरंगाबाद शहरामध्ये घडली आहे. औरंगाबादमध्ये नशेच्या गोळ्या कारमधून घेऊन जाण्याची एक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाला अटक केली असून संबंधित कारही जप्त केली आहे. याबाबत अधिक चौकशी केली असता, संबंधित कार औरंगाबादेतील माजी नगरसेवकाच्याभावाची असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

सध्या या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. सय्यद मंजूर असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. संबंधित आरोपी कारमधून नशेच्या गोळ्या घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना गुरुवारी मिळाली होती. या माहितीच्या अधारे सीटी चौक पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.

पोलिसांनी औरंगाबाद येथील अण्णा भाऊ साठे चौक परिसरात सापळा रचून आरोपीला अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी आरोपीकडून २६० नशेच्या गोळ्या जप्त केल्या आहेत. १३ स्ट्रीपमध्ये या २६० गोळ्या आढळून आल्या आहेत. पोलिसांनी आरोपी सय्यद मंजूर याच्याकडील गाडी जप्त करून अधिक तपास केला असता, संबंधित गाडी औरंगाबादमधील माजी नगरसेवक सय्यद मतीन याचे भाऊ सय्यद मोसीन यांची असल्याचं समोर आलं आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

Recent Comments