R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या प्रियंका गांधींच्या घोषणेची स्मृती इराणींनी उडवली खिल्ली नेमकं काय आहे प्रकरण वाचा...

प्रियंका गांधींच्या घोषणेची स्मृती इराणींनी उडवली खिल्ली नेमकं काय आहे प्रकरण वाचा ?

 

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे त्यातच काँग्रेसने सुद्धा जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ‘लडकी हूं लड सकती हूं’ अशी घोषणा दिली आहे. या घोषणेची केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी खिल्ली उडवली आहे.

घरी मुलगा आहे, पण लढू शकत नाही असं म्हणत त्यांनी प्रियंका गांधी यांच्यासह राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इराणी यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर टीका केली.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी एक घोषणा केली होती.

काँग्रेसच्या एकूण उमेदवारांपैकी ४० टक्के उमेदवार असतील असं त्यांनी जाहीर केलं होतं. ही घोषणा करत असतानाच त्यांनी ‘लडकी हूं लड सकती हूं’ अशी घोषणा दिली होती. स्मृती इराणी यांनी या घोषणेबाबत बोलताना म्हटले की याचा अर्थ असा होतो की ‘घरी मुलगा आहे पण लढू शकत नाही अशी खिल्ली त्यांनी उडवली होती

इराणी पुढे बोलताना म्हणाल्या की ‘लोकशाहीमध्ये आणि राजकारणात लोकांनी प्रयत्न करू नयेत असं मी म्हणत नाही, जय-पराजय हे राजकारणाचा हिस्सा आहेत. मी २०१४ ची निवडणूक हरले होते, मात्र तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांवर लोकांचा किती विश्वास आहे हे महत्वाचं आहे.’ हाच धागा पकडत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

Recent Comments