R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट या डेपोतील कर्मचारी झाले कामावर हजर

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट या डेपोतील कर्मचारी झाले कामावर हजर

रायगड | प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून नवीन २५०० उमेदवारांना कामावर रुजू करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यात एसटी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. महाड एसटी डेपोत कंट्रोलर, सफाई कर्मचारी कामावर परतले आहे. मान्य झालेल्या मागण्यांमुळे कर्मचारी समाधानी आहेत.

कर्मचारी कामावर रुजू झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट, पडल्याची चर्चा सुरु झाली आहे. राज्यभर एसटीच्या कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन सुरु असताना रायगडच्या महाडमध्ये मात्र एसटीचे कर्मचारी कामावर परतले आहेत. काल संध्याकाळपासुन कंट्रोलर तर आज सकाळपासुन सफाई कामगार कामावर हजर झालेत. मान्य झालेल्या मागण्यांवर समाधानी असल्याचे या कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, नाशिक आणि पुण्यात शिवशाही आणि शिवनेरी या बस सोडण्यात आल्या होत्या. सकाळी निघालेली शिवशाही बस पुण्यात पोहोचल्यानंतर इतर खासगी शिवशाही सोडण्यात येणार असल्याची एसटी प्रशासनाची माहिती दिली. मुंबईला ही बस सोडल्या गेल्या आहेत. तसेच पुणे, नाशिकनंतर सांगलीत खासगी शिवशाही बस सुरू करण्यात आल्या आहेत. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना बस स्थानाकासमोरून हटवले गेले आहे. सकाळी सांगली ते पुणे शिवशाही बस झाली रवाना झाली. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी बस स्थानकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments