R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मालमत्ता संरक्षणासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मालमत्ता संरक्षणासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न

 

ठाणे | जागेच्या नोंदी नसल्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेच्या अनेक आता हा प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाकडून मालमत्ता कर नोंदणीची विशेष मोहीम हाती घेण्यात आले आहे. याअंतर्गत आतापर्यंत वेगवेगळ्या विभागाच्या ९ हजार ४७७ अधिकृत जागांच्या नोंदणी तालुका स्तरावर पूर्ण झाल्या असून येत्या काही दिवसात ही मालमत्ता नोंदणी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या जागा आहेत. या जागांची जिल्हा परिषदेकडे नोंद नसल्यामुळे या जागांवर अतिक्रमण होण्याचे प्रकार वारंवार घडत होते. जिल्हा परिषदेच्या जागांवर होत असलेले अतिक्रमण रोखण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकरी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी ग्रामपंचायतस्तरावर मालमत्ता कर नोंदणी करण्याबाबत सर्व तालुक्यांना आदेश दिले. या जागांची नोंदणी पूर्ण व्हावी यासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये ८ जून रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली होती.

या मोहिमेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या अधिकृत जागांच्या नोंदणी करण्यात आल्या आहेत. यामध्ये बांधकाम विभाग, आरोग्य, प्राथमिक शिक्षण, पशुसंवर्धन, ग्रामीण पाणीपुरवठा, लघुपाटबंधारे अशा विविध विभागातील मालमत्तेचा समावेश आहे. शहापूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक म्हणजे ३ हजार २१ मालमत्ता असल्याची माहिती या मोहिमेतून समोर आली आहे. तर ठाणे तालुक्यात सर्वात कमी म्हणजे केवळ २७ मालमत्ता आहेत. या मालमत्ता नोंदणी लवकरच जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर समाविष्ट करण्यात येणार असून त्या सर्वांना पाहता येणार आहेत.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments