R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या  "चोरोंने है ललकारा, मिलेगा जवाब करारा"  

 “चोरोंने है ललकारा, मिलेगा जवाब करारा”  

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मागील दिवसांपासून ड्रग्स प्रकरणावरून आरोप करताना दिसत आहेत. त्यातच आता त्यांच्यावर ईडीची कारवाई होताना दिसत आहे. त्यांच्या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या वक्फ बोर्डाशी संबंधित पुणे घोटाळ्याची ईडीने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी ईडीने ईसीआयआर नोंदवला आहे. पुण्यात एकूण ७ ठिकाणी ईडीने छापे टाकल्याचे सांगण्यात येत आहे. यावरुनच आता मलिक यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवर टीकास्त्र सोडले आहे.
 यासंदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आज ते म्हणाले, ‘कालपासून माध्यमांद्वारे अफवा पसरवण्याचे काम सरकारी तपास यंत्रणांनी सुरु केले आहे. वक्फ बोर्डाच्या कार्यालयांवर छापे पडले आहेत, नवाब मलिक अडचणीत आले आहेत. पण मी ईडीच्या लोकांना हे सांगू इच्छितो, तुम्ही अफवा पसरवण्याचं काम बंद करा. पत्रकार परिषदा घेऊन किंवा प्रेसनोटद्वारे खऱ्या बातम्या द्या. बातम्या लीक करुन नुसता दंगा निर्माण करुन नका. मालकांना खूश करण्यासाठी हा खेळ खेळला जात आहे, मला माहित आहे’.
ते पुढे म्हणाले, ‘ज्या अधिकाऱ्याला असं वाटतंय की त्यांच्या मालकांनी सांगितले की, नवाब मलिक घाबरेल. मी त्यांना सांगतो की नवाब मलिक कोणाला घाबरत नाही, घाबरणार नाही. चोरोंने है ललकारा, मिलेगा जवाब करारा. मी स्पष्ट सांगतो, या प्रकारामुळे नवाब मलिक घाबरणार नाही. चोरांविरोधात ही लढाई सुरू केली आहे, ती शेवटपर्यंत चालेल’.
dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

महानगरपालिका,नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

  मुंबई |  कोवीड-19 मुळे प्रशासकीय आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या, अशा परिस्थितीत पडताळणी समित्यांकडून केवळ जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्यामुळे उमेदवारांना, राखीव असलेल्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

Recent Comments