R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति राज्यभरात आजपासून एसटी कर्मचाऱ्यांची कुटुंबीयांसह आगारासमोर निदर्शने करणार - सदाभाऊ खोत

राज्यभरात आजपासून एसटी कर्मचाऱ्यांची कुटुंबीयांसह आगारासमोर निदर्शने करणार – सदाभाऊ खोत

 

मुंबई | एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत ठाकरे सरकारकडून कोणत्याही प्रकारचा तोडगा काढण्यात आलेला नाहीये. शनिवारी आणखी आक्रमकपणे संप करण्यात येणार आहे. राज्यातील आगारासमोर एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसोबत शनिवारपासून निदर्शने केली जाणार आहेत, अशी माहिती रयत क्रांती संघटेनचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.

एसटीच्या आंदोलनाच्या संदर्भात परिवहनमंत्र्यांबरोबर स्वतंत्र बैठक झाली नाही. जी बैठक झाली ती सर्वांसमक्ष एकत्र झाली होती. परिवहनमंत्री दिशाहीन वक्तव्य करून खोटे बोलत आहेत, असा आरोप शेतकरी नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे. सदाभाऊ खोत म्हणाले की, एसटी कर्मचारी आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी राज्य सरकार पोलिसांना समोर आणून दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. बऱ्याच कर्मचाऱ्यांचे निलंबनही केले.

तसेच कोण्याही प्रस्ताव चर्चेसाठी आला नाहीये. त्यामुळे अनिल परब यांचा राजीनामा घ्यावा. नवीन परिवहनमंत्री येईल, त्याच्याबरोबर आम्ही चर्चेला तयार असल्याचे त्यांनी सांगितले. कॅश भरण्याच्या कंत्राटासाठी बाहेरच्या व्यक्तीला ९ कोटी दिले जातात, ते कशाला हवे, असा सवालही त्यांनी यावेळी केला. राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण करणार आहे की नाही? विलीनीकरणाची आमची प्रमुख मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

ममता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटू शकणार नाहीत

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात त्या शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे...

२३ वर्षांत नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की… मालिकांची नारायण राणेंवर घणाघाती टीका

  मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र टीका करण्याचे एकही संधी सोडताना दिसून येत नाहीये....

एनसीबीची मोठी कारवाई; ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

  राज्यात ड्रग्स प्रकरण चांगलेच गाजत असताना एनसीबीची कारवाई सुरूच असलेली दिसून येत आहे त्यातच एनसीबी मुंबईने नांदेडमध्ये कारवाई करत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments