R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या डोंबिवली रेल्वे स्थानिकाजवळ फेरीवाल्यांवर मनपाची कारवाई

डोंबिवली रेल्वे स्थानिकाजवळ फेरीवाल्यांवर मनपाची कारवाई

 

डोंबिवली | डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील रस्ते, पदपथ अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांवर पालिका अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळपासून कारवाई सुरू केली. फेरीवाल्यांवरील कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवाशांना लवकरच चालताना मोकळा श्वास घेत चालता येणार आहे.

डोंबिवली पश्चिमेतील फेरीवाला हटाव पथकातील १५ कामगार रेल्वे स्थानक परिसरातील गुप्ते रस्ता, दीनदयाळ, महात्मा फुले रस्ता, महात्मा गांधी रस्ता, विष्णुनगर परिसर फेरीवालामुक्त करतात. मग डोंबिवली पूर्व भागातील ग, फ प्रभागातील ३० कामगारांना ३०० फेरीवाल्यांना हटविण्यात कोणते अडथळे येतात, असे प्रश्न पादचारी करत होते. ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये ‘डोंबिवलीला फेरीवाल्यांचा वेढा’ या शीर्षकाखाली शुक्रवारी वृत्त प्रसिद्ध झाले.

त्याची पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यामुळे ग प्रभागाचे पथक प्रमुख रमाकांत जोशी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील डॉ. रॉथ रस्ता, पाटकर रस्ता, रामनगर, राजाजी रस्ता भागात फेरीवाल्यांवर कारवाईसाठी रस्त्यावर उतरले होते. फेरीवाल्यांना रस्त्यावरून हटविण्याबरोबर त्यांचे सामान जप्त केले जात होते.

डोंबिवली रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यावर पूर्व भागात फेरीवाल्यांचे अडथळे सहन करत रिक्षा वाहनतळापर्यंत जावे लागते. सकाळ, सायंकाळ नोकरदार, पादचाऱ्यांना होणारा हा त्रास होऊ नये यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. फेरीवाल्यांवर दिखाव्यापुरती कारवाई करू नये अशी मागणी करण्यात आली होती.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

महानगरपालिका,नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

  मुंबई |  कोवीड-19 मुळे प्रशासकीय आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या, अशा परिस्थितीत पडताळणी समित्यांकडून केवळ जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्यामुळे उमेदवारांना, राखीव असलेल्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

Recent Comments