R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या शब्द न पाळणारं...पळवाट काढणारं 'रणछोडदासाचं' हे सरकार - चित्रा वाघ

शब्द न पाळणारं…पळवाट काढणारं ‘रणछोडदासाचं’ हे सरकार – चित्रा वाघ

 

मुंबई | एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी मागच्या दोन आठवडयापासून एसटी कर्मचारी आंदोलन करत असून सध्या हे आंदोलन अधिक चिघळताना दिसून येत आहे. त्यातच या आंदोलनामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने उभे ठाकले आहे. त्यातच यावर आता भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी थेट ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. परिवहनमंत्री अनिल परब हे आपल्या शब्दावरून पलटी मारत आहेत. शब्द न पाळणारं…पळवाट काढणारं ‘रणछोडदासाचं’ हे सरकार आहे, अशी टीका वाघ यांनी केली आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, अनिलजी परब यांनी एकेकाळी म्हंटले होते कि आम्ही एसटी कर्मचाऱ्यांना मागण्यांसाठी रस्त्यावर आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही. अनिल परबजी, किती खोट्या शपथा अन् वचनं घेणार आहात. थोडी फार उरली असेल तर शब्दाला जागा. तुम्ही आपल्या शब्दावरून पलटी मारताय. शब्द न पाळणारं.पळवाट काढणारं ‘रणछोडदासाचं’ हे सरकार आहे, असे वाघ यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.

दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी यापूर्वीही ट्विट करीत ठाकरे सरकारवर टीका केली होती. त्यांनी यापूर्वी म्हंटले होते की, ऐन दिवाळीत २ हजार #ST कर्मचा-यांना निलंबित करून त्यांच्या चुली बंद करण्याचं पाप सरकारनं केलंय. नोकरी घालवणं, उपाशी मारणं, बेघर करणं, आत्महत्येस प्रवृत्त करणं हाच का महाविकास आघाडी सरकारचा कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे का? हे सरकारच कायमचं निलंबित करण्याची वेळ आलीय. निलंबन सरकारचा धिक्कार असो !, असे वाघ यांनी म्हंटले होते.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments