R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या निस्वार्थ सेवा केलेल्या कोविड योध्याचा ठाण्यात होणार सन्मान !

निस्वार्थ सेवा केलेल्या कोविड योध्याचा ठाण्यात होणार सन्मान !

ठाणे | वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष’ आणि ‘डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन‘ यांच्या सयुंक्त विद्यमाने ४ थ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत स्वतःच्या जीवाची बाजी लावून एका सेवाभावी सैनिकाच्या भूमिकेतून निस्वार्थी रुग्णसेवा केलेल्या ‘कोविड योद्धांना’ सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या रविवारी दिनांक १४ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी ३ वाजता ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, ठाणे (पश्चिम) येथे एका दिमाखदार कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील निवडक सामाजिक कार्यकर्त्यांना ‘कोविड योद्धा सन्मान’ प्रदान करण्यात येणार आहे.

या व्यतिरिक्त ज्या रुग्णालयांनी या कोविड संकट काळात कोरोना बाधितांना अविरत – अविश्रांत सेवा दिली अशा महाराष्ट्रातील निवडक ५० रुग्णालयांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे, नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. एकनाथजी शिंदे, राज्यमंत्री मा.अदितीताई तटकरे, राज्यमंत्री मा. श्री. बच्चू भाऊ कडू, श्री.वरुणजी सरदेसाई, पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, एबीपी माझा वृत्त वाहिनीचे मुख्य संपादक श्री.राजीवजी खांडेकर, महाराष्ट्र डिजीटल मिडिया संपादक, पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री.राजा माने, चित्रपट अभिनेते श्री.मंगेश देसाई आदी मान्यवरांच्या हस्ते ‘कोविड योद्धा सन्मान’ सोहळा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

पहिल्या सत्रात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या ‘वेबसाईट’ व ‘मोबाईल अँप’ चा उद्घघाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला माजी राज्यपाल मा.पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील, खासदार संजय राऊत, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, राज्यमंत्री विश्वजित कदम, झी २४ तास वृत्तवाहिनी चे मुख्य संपादक निलेश खरे, खा. राजन विचारे, आ. प्रताप सरनाईक, ठाणे शहराचे महापौर नरेश म्हस्के तसेच ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व लोक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. उद्घघाटन सोहळ्यानंतर आरोग्य परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या परिसंवादात सिने अभिनेते श्री.शरद पोंक्षे, जुपिटर हॉस्पिटल येथील हृदयरोग तज्ञ विजय सुरासे, जेष्ठ पत्रकार संतोष आंधळे, जेष्ठ पत्रकार संदीप आचार्य आदी सहभागी होणार आहेत. तर परिसंवादाचे सूत्र संचालन न्यूज १८ लोकमत चे जेष्ठ पत्रकार मिलिंद भागवत करणार आहेत. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन निवेदक राजेंद्र पाटणकर करणार आहेत.

या कार्यक्रमाला जास्तीतजास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मार्गदर्शक खा.डॉ.श्रीकांत शिंदे आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य डिजीटल पत्रकार संघटनेचे सहकार्य लाभले असून, ठाणे शहरातील अग्रगण्य दैनिक ठाणे वैभव, समाज माध्यमांवरील लोकप्रिय वेब पोर्टल बोल भिडू, ठाणे लाईव्ह, महाराष्ट्र माझा मिडिया पार्टनर म्हणून असणार आहेत. कार्यक्रमाच्या मध्यंतरानंतर स्नेह भोजनाची तर कार्यक्रमाच्या समारोपानंतर अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments