R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा नगरसेवकांचे रिपोर्ट-कार्ड तपासणार

महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा नगरसेवकांचे रिपोर्ट-कार्ड तपासणार

 

ठाणे | ठाणे महानगर पालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता भाजपने सुद्धा जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच विद्यानं नगरसेवकांना तिकीट देताना त्यांचे प्रगती पुस्तक तपासण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. विद्यमान नगरसेवकांचे प्रगती पुस्तक समाधानकारक असेल तरच त्याला आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा तिकीट देण्याचा निर्णय भाजपा नेत्यांनी घेतला आहे

ठाणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या तर भाजप नगरसेवकांच्या संख्येनुसार तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. सध्या ठाणे महापालिकेत भाजपचे २३ नगरसेवक असून ही संख्या वाढवण्यासाठी भाजप आतापासूनच कामाला लागली आहे. वरिष्ठ पातळीवर महाविकास आघाडीचे नेते आघाडीची भाषा करत असले तरी, स्थानिक पातळीवर मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळत असल्याने हीच संधी नेमकी भाजप उचलण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने भाजपच्या वतीने आता व्यूहरचना आखण्यात येत आहे.

गुजरातमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने जुन्या चेहऱ्यांना घरी बसवून नव्या चेहऱ्यांना संधी दिली. त्याचा फायदाही त्यांना झाल्याचे दिसून आले आहे. त्याच धर्तीवर आता ठाण्यातही गुजरात पॅटर्ननुसार भाजपच्या शिष्टमंडळाकडून सर्व्हे सुरु करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या भाजपच्या तीन दिवसीय शिबिरात देखील उपस्थिती कमी दिसल्याने भाजपच्या वरीष्ठ नेत्याने आपल्या भाषणात असेच झाले तर नक्कीच गुजरात पॅटर्नचा विचार करावा लागेल असे सुचक विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर पुढील दोन दिवस नगरसेवकांसह इतर पदाधिकाऱ्यांनी मोठय़ा संख्येने हजेरी लावल्याचे दिसून आले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

स्वच्छ सर्वेक्षणात बदलापूर अव्वल, राज्यात दुसरा,देशात १४वा क्रमांक

बदलापूर | स्वच्छ सर्वेक्षणात भरारी घेत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा राज्यातून दुसरा, तर देशातून १४वा क्रमांक पटकावला आहे. तीन वर्षांत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने स्वच्छ...

“निवडणुका झाल्या तरी जनतेचा कौल महाविकास आघाडीलाच मिळेल”

  मुंबई |  राज्यात आघाडीचे सरकार कोसळेल अशी भविष्यवाणी सतत विरोधक करताना दिसून येत आहे. त्यातच आता सरकार आज पडणार, उद्या पडणार अशी दिवास्वप्ने वीरोधकांनी...

पाचवी व सहावी रेल्वे मार्गिका लवकरच सेवेत

  डोंबिवली : मुंब्रा-कळवा दरम्यानच्या नव्या पाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पूर्ण झालेल्या कामांची अंतिम चाचपणी सुरू असून हे काम पूर्ण...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

Recent Comments